Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश Chandrayaan-3 मोठी अपडेट; दक्षिण ध्रुवावर ऑक्सिजनसह सापडले 'हे' धातू

Chandrayaan-3 मोठी अपडेट; दक्षिण ध्रुवावर ऑक्सिजनसह सापडले ‘हे’ धातू

Subscribe

चांद्रयान-3 कडून एक मोठी अपडेट समोर आली आहे. प्रज्ञान रोव्हरनं एक मोठी अपडेट इस्रोला पाठवली आहे. इस्रोने ट्वीट केल्याप्रमाणे, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ऑक्सिजन वायू काही प्रमाणात सापडला आहे. तसंच, सल्फर, आयर्न, अल्युमिनिअम, कॅल्शिअम हे धातू देखील काही प्रमाणात चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आहेत. सध्या हायड्रोनचा शोध घेतला जात आहे, असं इस्रोने ट्वीट करत सांगितलं आहे.

नवी दिल्ली: चांद्रयान-3 कडून एक मोठी अपडेट समोर आली आहे. प्रज्ञान रोव्हरनं एक मोठी अपडेट इस्रोला पाठवली आहे. इस्रोने ट्वीट केल्याप्रमाणे, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ऑक्सिजन वायू काही प्रमाणात सापडला आहे. तसंच, सल्फर, आयर्न, अल्युमिनिअम, कॅल्शिअम हे धातू देखील काही प्रमाणात चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आहेत. सध्या हायड्रोनचा शोध घेतला जात आहे, असं इस्रोने ट्वीट करत सांगितलं आहे. (Chandrayaan 3 major update Sulfur iron oxygen aluminum calcium were found at the South Pole of the Lunar Moon)

- Advertisement -

इस्रोने ट्वीट करत सांगितलं आहे की, रोव्हरला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ऑक्सिजनसह सल्फर, आयर्न, अल्युमिनिअम, कॅल्शिअम अल्पशा प्रमाणात सापडलं आहे. तर आता हायड्रोजन दक्षिण ध्रुवावर आहे का याबाबतची शोधमोहिम सध्या सुरू आहे.

तसंच, काही वेळापूर्वीच चांद्रयान-3 च्या विक्रम लँडरसोबत गेलेल्या प्रज्ञान रोव्हरने चंद्रावरून आपली खुशाली कळवली आहे. प्रज्ञान रोव्हरने एक मेसेजही पाठवला आहे. यात त्यानं पृथ्वीवासियांसंदर्भातही भाष्य केलं आहे. रोव्हरनं म्हटलं आहे की, तो आणि त्याचा मित्र विक्रम लँडर संपर्कात आहेत आणि दोघेही खुशाल आहेत.

- Advertisement -

गगनयान-1 सोडणार भारत

चांद्रयान-3 मोहिमेच्या यशानंतर गगनयान-1 ची चर्चा अधिक तीव्र झाली आहे. भारताचे हे पहिलेच मिशन असेल ज्यामध्ये मानवाला अंतराळात पाठवले जाईल. या मोहिमेचे तीन टप्पे असतील ज्यामध्ये दोन वेळा मानवरहित उड्डाणे पाठवली जातील आणि त्यानंतर एका उड्डाणात मानवाला अवकाशात पाठवले जाईल. या मोहिमेत तीन अंतराळवीर पाठवले जाणार आहेत.

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी शनिवारी या मिशनबद्दल सांगितले की, गगनयान मोहिमेच्या चाचणीसाठी महिला रोबोट व्योमित्र पाठवण्यात येणार आहे. येत्या ऑक्टोबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात चाचणी अंतराळ उड्डाणाचा प्रयत्न केला जाईल. महामारीमुळे गगनयान प्रकल्पाला विलंब झाला होता. भारताच्या मानवी अंतराळ मोहिमेला गगनयान असे नाव देण्यात आले आहे. परंतु गगनयानाच्या फायनल मिशनआधी ट्रायल मिशन होणार आहे. गगनयानाच्या प्रत्यक्ष उड्डाणापूर्वी तीन चाचणी मोहिमा केल्या जातील. या तीन चाचणी मोहिमा मानवरहित असतील.

- Advertisment -