घरदेश-विदेशLok Sabha 2024 : इंदोर आणि खजुराहोमध्ये भाजपा बिनविरोध? मध्य प्रदेशातही सुरत...

Lok Sabha 2024 : इंदोर आणि खजुराहोमध्ये भाजपा बिनविरोध? मध्य प्रदेशातही सुरत पॅटर्न

Subscribe

Lok Sabha Election 2024 : पाच टप्प्यांचे मतदान बाकी आहे. आणि त्यापूर्वीच सुरतमध्ये भाजपा उमेदवार मुकेश दलाल हे बिनविरोध विजयी झाले आहेत. त्यापाठोपाठ आता मध्य प्रदेशातील दोन जागांवरही भाजपा बिनविरोध निवडून येण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीला सुरुवात झाली असून आतापर्यंत दोन टप्प्यांचे मतदान झाले आहे. अजून पाच टप्पे बाकी आहेत. आणि त्यापूर्वीच सुरतमध्ये भाजपा उमेदवार मुकेश दलाल हे बिनविरोध विजयी झाले आहेत. त्यापाठोपाठ आता मध्य प्रदेशातील दोन जागांवरही भाजपा बिनविरोध निवडून येण्याची शक्यता आहे. (Lok Sabha Election 2024 congress candidate withdrew his name in indore seat congress is not in the fray in khajuraho seat)

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याच्या मतदानापूर्वी मध्य प्रदेशातील इंदोर आणि खजुराहो या जागांवर काँग्रेसचा कोणीही उमेदवार नाही. प्रतिस्पर्धी उमेदवारच नसल्याने येथील भाजपा उमेदवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाल्याचे दिसते आहे. दरम्यान, अशा पद्धतीने मतदान होण्यापूर्वीच कोणी जिंकणं अशा गोष्टी कमी घडत असतात. मात्र, तरीही अद्याप पाच टप्प्यांतील मतदान बाकी असताना तीन जागा अशा आहेत जिथे भाजपचा विजय निश्चित मानला जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha 2024 : वंचितने पुन्हा बदलला उमेदवार; उत्तर मुंबईतून सोनल गोंदाणे यांना उमेदवारी जाहीर

शेवटच्या दिवशी मागे घेतला उमेदवारी अर्ज

अर्ज माघारीच्या दिवशी मध्य प्रदेशातील इंदोर येथून काँग्रेस उमेदवार अक्षय कांती बम यांनी आपला अर्ज मागे घेतला आहे. एवढेच नाही, तर बम यांनी थेट भाजपातच प्रवेश केला आहे. यामुळे काँग्रेसला मोठाच धक्का बसला आहे. बम यांच्यानंतर काँग्रेस मोती सिंह पटेल यांना पाठिंबा देण्याचा विचार करत असतानाच त्यांचा अर्ज बाद झाला. हा देखील काँग्रेससाठी धक्का मानला जात आहे. पटेल यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला होता. यामुळे इंदोरचे भाजपा उमेदवार शंकर लालवानी यांच्यासमोर काँग्रेसचा एकही उमेदवार नाही. इंदोरमध्ये चौथ्या टप्प्यात म्हणजे 13 मे रोजी मतदान होणार आहे. (Lok Sabha Election 2024 congress candidate withdrew his name in indore seat congress is not in the fray in khajuraho seat)

- Advertisement -

खजुराहोत समाजवादी पक्षाच्या उमेदवाराचा अर्ज बाद

मध्य प्रदेशातील खजुराहो लोकसभा जागेवर काँग्रेसने समाजवादी पक्षाच्या उमेदवाराला संधी दिली होती. मात्र, त्यांचा अर्ज बाद झाला. यामुळे भाजपा उमेदवाराचा जिंकण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. येथे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विष्णू दत्त शर्मा हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. खजुराहोत 26 एप्रिल रोजी मतदान झाले आहे.

हेही वाचा – MNS Vs Congress : काँग्रेसचे चिन्ह बदला किंवा पोलिसांच्या गणवेशावरील…, मनसेच्या नव्या मागणीने वाद

सुरतमध्ये भाजपचे मुकेश दलाल विजयी

या निवडणुकीत सर्वात पहिल्यांदा भाजपच्या मुकेश दलाल यांनी विजय पटकावला. येथील काँग्रेस उमेदवार निलेश कुंभानी याचा अर्ज रद्द झाला. यानंतर बाकी अपक्ष उमेदवारांनी देखील अर्ज मागे घेतले. यामुळे आता येथे केवळ मुकेश दलाल हेच उमेदवार आहेत. इथे 7 मे रोजी मतदान होणार आहे. (Lok Sabha Election 2024 congress candidate withdrew his name in indore seat congress is not in the fray in khajuraho seat)


Edited by : Ashwini A. Bhatavdekar

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -