घरपालघरWada Roads: वाड्यातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची कामे निकृष्ट दर्जाची

Wada Roads: वाड्यातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची कामे निकृष्ट दर्जाची

Subscribe

माती मुरूम भरावाऐवजी येथे विटांचे तुकडे टाकण्यात आले असल्याची धक्कादायक माहिती येथील ग्रामस्थांनी दिली.

वाडा: तालुक्यातील मांडा- खरीवली- भोपीवली या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असतानाच आता घोणसई येथील रस्त्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून या कामाची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. वाडा तालुक्यात सद्यस्थितीत मांडा- भोपिवली- खरीवली या रस्त्याच्या सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने ग्रामस्थांनी हे काम काही काळ थांबवले होते. काम पुन्हा सुरू झाल्यानंतर निकृष्ट दर्जाचा माल आल्याने पुन्हा ग्रामस्थांनी यावर आवाज उठवला आहे. या कामाबरोबरच घोणसई येथेही काम सुरू असून हेही बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत आहे.अंदाजपत्रकाप्रमाणे हे काम होत नसून जीएसबी ऐवजी येथे कपची टाकण्यात आली आहे.माती मुरूम भरावाऐवजी येथे विटांचे तुकडे टाकण्यात आले असल्याची धक्कादायक माहिती येथील ग्रामस्थांनी दिली.

जीएसबी आणि डीएलसी हे बांधकाम साहित्य रस्त्यावर टाकताना ही पेव्हर फिनीशर मशिनने टाकण्याचा नियम आहे. मात्र हे नियम धाब्यावर बसवून ट्रकद्वारे टाकून जेसीबीच्या सहाय्याने पसरवण्यात येत आहे. जीएसबी आणि डीएलसी या साहित्याची जाडी चार इंच असताना त्याप्रमाणे ते टाकण्यात आलेले नाही. रस्त्याचे काम सुरू करण्या अगोदर बांधकाम साहित्याची तपासणी करण्यासाठी प्रयोगशाळा उभारण्याची अट आहे. मात्र ठेकेदाराने हे सर्व नियम व अटी पायदळी तुडवले आहेत.घोणसईमध्ये कुठेही प्रयोग शाळा उभारण्यात आलेली नाही.रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने हा रस्ता किती काळ टिकेल या बाबत ग्रामस्थांच्या मनात शंका निर्माण झाली आहे. यासंदर्भात मयुर कंट्रक्शन अँड डेव्हलपर्स चे संचालक संदीप ठाकरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. तर या कामावर नियंत्रण ठेवणारे कनिष्ठ अभियंता अभिजीत बोंबे यांच्याशी संपर्क साधला असता या कामाची उप अभियंत्यांसह पहाणी करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली.

- Advertisement -

प्रतिक्रिया

घोणसई येथील रस्त्याचे बांधकाम अंदाजपत्रकानुसार न करता अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असून शासनाचे नियम ठेकेदाराने पायदळी तुडवले गेले आहेत.संबंधित विभागाशी तोंडी तक्रारी करूनही त्याची दखल घेतली जात नाही.या कामाची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी आमची मागणी आहे.
-शैला जाबर
सरपंच ,ग्रामपंचायत ,घोणसई मेट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -