घरपालघरजव्हार येथे कुस्त्यांचे जंगी सामने संपन्न

जव्हार येथे कुस्त्यांचे जंगी सामने संपन्न

Subscribe

जव्हार नगरपरिषद व नागरिकांच्या सहभागातून कुस्ती पैलवानांना रोख रक्कमा बक्षीस म्हणून देण्यात आल्या. या कार्यक्रमात एकूण २५० कुस्त्या खेळविण्यात आल्या.

जव्हार: ऐतिहासिक जव्हार शहराला संस्थान काळापासून विविध सण उत्सव साजरे करण्याची एक विस्तृत परंपरा आहे. याचाच एक भाग जव्हारचा दरबारी दसरा साजरा करण्यात आला. दरबारी दसर्‍याच्या दुसर्‍या दिवशी जुना राजवाडा येथील मैदानात जव्हार नगर परिषद व ग्रामस्थांच्या सहकार्याने कुस्त्यांचे जंगी सामने आज संपन्न झाले. या कुस्त्या पाहण्यासाठी संपूर्ण पालघर जिल्ह्यातून हौशी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर मोठ्या प्रमाणावर पैलवान नाशिक, शिर्डी, मनमाड नगर,ऒरंगाबाद, भिवंडी, चाळीसगाव व जव्हार ,मोखाडा भागातून कुस्ती खेळण्यासाठी आले होते. जव्हार नगरपरिषद व नागरिकांच्या सहभागातून कुस्ती पैलवानांना रोख रक्कमा बक्षीस म्हणून देण्यात आल्या. या कार्यक्रमात एकूण २५० कुस्त्या खेळविण्यात आल्या.

साधारण १००० हजार ३००० हजार व पुढे ५००० हजारापर्यंत कुस्ती पैलवानांना रोख रकमा व प्रमाणपत्र देण्यात आले. या कुस्त्यांमध्ये भाऊसाहेब मार्तंड,मुकेश पवार ,निशांत बागुल,किरण पवार,गौरव यादव,मनोज भांगरे, रमजान पठाण,अली शहा ,देविदास टेनकर, योगेश आयरे, संदिप पाटील,अजय गवळी या नावाजलेल्या पहिलवानांनी कुस्त्या खेळून आपले कसब दाखविले. शेवटच्या दोन कुस्त्या भाऊसाहेब मार्तंड (रा . मालेगाव) व निशांत बागुल (रा. त्रंबकेश्वर यांच्यात झाली. यामध्ये निशांत बागुल हे विजयी झाले. तर शेवटची कुस्ती मुकेश पवार (रा.चाळीसगाव) व भाऊसाहेब मार्तंड यांच्यात झाली. यामध्ये मुकेश पवार विजयी झाले. या विजयी पैलवानांना कुस्ती समितीचे सभापती निलेश घोलप, उपसभापती इक्बाल कोतवाल, माजी नगरसेवक विजय घोलप यांच्या हस्ते रोख पारितोषिक ५००० रुपये, शाल- श्रीफळ व चषक देण्यात आला. या कुस्त्यांचे पंच म्हणून अनंता घोलप, विवेक शिरसाट, इक्बाल कोतवाल, संजय वनमाळी, सुनील ठमके, डहाळे बुवा,निवत्ती बेनके,त्रिंबक बेनके,नरेश महाले यांनी काम पाहिले. तर कुस्त्यांच्या कार्यक्रमाचे समालोचन मनीष घोलप यांनी केले. सर्व पंचांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन नगर पालिकेचे सभा अधिक्षक उत्तम शेवाळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच जव्हारचे राजघराण्यातील संस्थानिक मार्तंडराव मुकणे यांचा देखील सत्कार सभापतीच्या हस्ते करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी नगरपालिकेचे कर्मचारी उत्तम शेवाळे, नरेश भोईर, कल्पेश गारे, मुद्दसर शेख, पंढरी बेनके,रमेश भरसट यांनी विशेष परिश्रम घेतले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -