घरफोटोगॅलरीPhoto: कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी वापरता येणारा 'रोबो'

Photo: कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी वापरता येणारा ‘रोबो’

Subscribe

वॉर्ड बॉईज, परिचारिका हे कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी आघाडीवर असणारे आपल्या समाजातील कोरोना योद्धे आहेत आणि रुग्णांसोबत त्यांना सर्वात जास्त काळ व्यतीत करावा लागतो. त्यामुळे त्यांना मदत करण्याच्या उद्देशाने इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंगमध्ये पदवी घेतलेल्या प्रतीक तिरोडकरने ‘कोरो-बॉट’ची निर्मिती केली. त्यासाठी त्याला तीन ते चार सहकाऱ्यांची मदत झाली. रोबोटचे पार्ट तयार करणारी दुकाने बंद असल्याने त्यांनी स्वतः ते पार्ट तयार केले आहेत. पंधरा ते वीस दिवसात तयार केलेला हा प्रायोगिक रोबो सध्या कल्याण येथील होली क्रॉस रुग्णालयात सेवा देतो आहे. प्रतीकला विश्वास आहे की, तो दर आठवड्याला दोन ते तीन रोबो तयार करू शकतो. या रोगाच्या संचलनासाठी प्रतीक आणि त्याच्या टीमने एक स्पेशल अॅप तयार केले आहे. प्रतीक सारख्या उत्साही तरुणांच्या प्रयत्नांमुळे आत्मनिर्भर बनवण्याचे भारताचे स्वप्न लवकरच साकार होईल. (छायाचित्र – दीपिका साळवी)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -