घरफोटोगॅलरीPhoto : न्यूझीलंड विरुद्धच्या टी-20 सामन्यात बाबर आझम आणि शाहीन आफ्रिदीचे विक्रम

Photo : न्यूझीलंड विरुद्धच्या टी-20 सामन्यात बाबर आझम आणि शाहीन आफ्रिदीचे विक्रम

Subscribe

लाहोर : न्यूझीलंड विरुद्धच्या पाचव्या टी-20 सामन्यात, पाकिस्तान 9 धावांनी विजयी झाला. मात्र, पाच सामन्यांची T20 मालिका अनिर्णित राहिली. मालिकेतील पहिल्या सामन्यात कोणताही निकाल लागला नाही. तर, अन्य सामन्यांपैकी न्यूझीलंडने 2 तर पाकिस्तानने 2 सामने जिंकले. या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आणि गोलंदाज शाहीन आफ्रिदी यांनी वेगळ्या विक्रमांची नोंद केली.

- Advertisement -

कर्णधार बाबर आझमने न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या टी-20 सामन्यात जोरदार फलंदाजी केली. त्याने 44 चेंडूत 69 धावा केल्या. बाबरचे हे टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यातील 34वे अर्धशतक आहे.

- Advertisement -

त्याचबरोबर बाबरने आयरिश फलंदाज पॉल स्टर्लिंगचा विश्वविक्रम मोडला आहे. आता बाबर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक चौकार मारणारा फलंदाज ठरला आहे.

 

बाबरने आतापर्यंत टी-20मध्ये एकूण 409 चौकार मारले आहेत. तर पॉल स्टर्लिंगने आपल्या टी-20 कारकिर्दीत एकूण 407 चौकार मारले होते. भारतीय फलंदाज विराट कोहलीने आतापर्यंत 361 चौकार मारले आहेत.

याशिवाय बाबर आझमने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक विजय मिळविले आहेत. बाबरने आपल्या नेतृत्वाखाली 44 सामन्यांत पाकिस्तानला विजय मिळवून दिला आहे. युगांडाचा कर्णधार ब्रायन मसाबा यानेही 44 सामन्यात विजय मिळविला आहे.

या सामन्यात गोलंदाज शाहीन आफ्रिदीनेही टी-20मध्ये पहिल्याच षटकात सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे.

शाहीनने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत टी-20मधील पहिल्या षटकात एकूण 50 विकेट्स घेतल्या आहेत.

भारताचा भुवनेश्वर कुमार हा दुसऱ्या स्थानावर असून भुवीने टी-20मध्ये पहिल्याच षटकात आतापर्यंत 43 विकेट्स घेतल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -