घरफोटोगॅलरीPHOTO : श्रेयस अय्यरच्या आयपीएलमध्ये 3000 धावा, विराट आणि गंभीरला टाकले मागे

PHOTO : श्रेयस अय्यरच्या आयपीएलमध्ये 3000 धावा, विराट आणि गंभीरला टाकले मागे

Subscribe

कोलकाता : येथील ईडन गार्डनवर रंगलेल्या आयपीएल 2024च्या 47व्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने (KKR) दिल्ली कॅपिटल्सवर (DC) सात गडी राखून विजय मिळवला. गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर असलेल्या केकेआरच्या खात्यात आता 12 गुण आहेत. तर दिल्लीचा या हंगामातील सहाव्या पराभवासह सहाव्या स्थानावर घसरण झाली आहे. केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यरने आयपीएलमध्ये मोठ्या कामगिरीची नोंद केली आहे.

- Advertisement -

श्रेयस अय्यरने आयपीएलमध्ये 3000 धावा पूर्ण केल्या आहेत. एक भारतीय खेळाडू म्हणून तो सर्वात कमी डावात 3000 धावा करून तो विराट कोहली आणि गौतम गंभीरच्या पुढे गेला आहे.

- Advertisement -

सर्वात कमी डावात 3000 धावा करण्याचा विक्रम केएल राहुलच्या नावावर आहे. त्याने अवघ्या 80 डावात ही कामगिरी केली.

केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यरने 109 डावात 3000 धावा केल्या आहेत. रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनीही एवढ्याच डावांमध्ये 3000 धावा केल्या आहेत.

गौतम गंभीर आणि विराट कोहलीनेने 110-110 डावात 3000 धावा केल्या आहेत.

श्रेयस अय्यरने सोमवारी दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात 3 चौकार आणि 1 षटकार सहाय्याने 23 चेंडूत 33 धावांची नाबाद खेळी केली.


Edited by Manoj S. Joshi

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -