मुंबई : देशभरात आज दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्सवात साजरा करण्यात येत आहे. मुंबई आणि ठाण्यातही मोठ मोठ्या दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकाकडून 9 ते 10 थर लावण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील टेंभीनाका, घाटकोपर येथे आमदार राम कदम, आमदार प्रकाश सुर्वे यांनी मागाठणे येथे तर, दादरमध्ये शिवसेना भवनजवळ युवासेनेकडून निष्ठा दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. तसेच दरवर्षीप्रमाणे दादर येथील आयडियल बुक डेपोजवळ दहीहंडी साजरी करण्यात आली. (PHOTO Excitement of Govinda Re Gopala in Mumbai and Thane)
दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकाकडून मोठे-मोठे थर लावण्याचा प्रयत्न होताना दिसत आहेत. यात दृष्टीहीन गोविंदा पथकही मागे नाही. ज्ञान फाऊंडेशनच्या दृष्टीहीन मुला-मुलींच्या गोविंदा पथकांनी वरळी येथे दहीहंडीला हजेरी लावलेली पाहायला मिळाली.
दरवर्षीप्रमाणे यंदाही दादर येथील आयडीअल बुक डेपो येथे दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिला गोविंदा पथकाकडून चार थर लावून दहीहंडी फोडण्यात आली. यानंतर गोविंदा पथक सेल्फी घेऊन आनंद साजरा करताना दिसत आहेत.
मुंबई आणि ठाण्यात मोठ्या प्रमाणावर उत्सव साजरा करण्यात येतो. यंदाही गोविंद पथकांचे मोठे मोठे थर पाहण्यासाठी मुंबईकरांनी मोठी गर्दी केली आहे. गेल्या महिन्यापासून आज विश्रांती घेतलेल्या पावसाने जोरदार हजेरी लावली, मात्र या पावसातही दहीहंडीचा उत्साह कुठेही कमी झाल्याचे पाहायला मिळाले नाही.
मुंबई आणि ठाण्यातील गोविंदा पथकांनी मानाच्या हंड्यांच्या ठिकाणी हजेरी लावून सलामी दिली आहे. तर काही गोविंदा पथकांनी गल्ली, बोळातील दहीहंडी फोडल्याचे पाहायला मिळाले.
दहीहंडी उत्सव मोठ्या उत्सहात साजरा होत असताना मुंबईत 35 तर, ठाण्यात 13 गोविंदा जखमी झाले आहेत. यात एका महिला गोंविदाचाही समावेश आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार प्रकाश सुर्वे यांच्या बोरिवली पूर्वच्या मागाठाणे येथील दहीहंडीला हजेरी लावली. यावेळी मंचावर श्रीफळाने हंडी फोडली. यावेळी त्यांच्यासोबत खासदार गोपाळ शेट्टी, मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड. आशिष शेलार, भाजपा विधान परिषदेचे गटनेते प्रवीण दरेकर, जिल्हा अध्यक्ष गणेश खणकर आदी उपस्थित होते.
नागपूर : नागपूरमध्ये गुरुवारपासून (21 सप्टेंबर) पावसाची सततधार सुरू असून आज (23 सप्टेंबर) अवघ्या 4 तासांत 100 मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे अंबाझरी...
मुंबई : घरोघरी विराजमान झालेल्या दीड दिवसांच्या बाप्पाला आज निरोप देण्यात आला. लाडक्या बाप्पाला पहिल्याच दिवसापासून त्याच्या आवडीच्या मोदकाचा नैवेद्य दाखवून बाप्पाचे पूजन करण्यात...
मुंबई : गणरायाच्या आगमनाला अगदी 3 दिवस उरले आहेत. त्यामुळे खरेदीसाठी लगमग सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. आपल्या घरी येणाऱ्या लाडक्या बाप्पासाठी वेगळी आरास...