घररायगडखालापूरमधील मिरकूटवाडी गावाच्या हद्दीत नदीत अतिक्रमण, पाटबंधारे अधिकार्‍यांनी केले दुर्लक्ष

खालापूरमधील मिरकूटवाडी गावाच्या हद्दीत नदीत अतिक्रमण, पाटबंधारे अधिकार्‍यांनी केले दुर्लक्ष

Subscribe

मिरकूटवाडी गावाच्या हद्दीतून जाणारी नदी पातळगंगा नदीला जाऊन मिळते. या नदीत कंपनी, फार्म हाऊस, हॉटेलसह अनेकांनी संरक्षण भिंती बांधल्या असल्याने नदी अरुंद होत आहे. पावसाळी पाण्याचा फटका नदी शेजारी असणार्‍या घरांना, शेतकर्‍यांना व रस्त्यांना बसत आहे.

खालापूर तालुक्यातील मिरकूटवाडी गावाच्या हद्दीत असणार्‍या नदीलगत एका फार्म हाऊसच्या मालकाने आपल्या जमिनीचे सपाटीकरण करत नदीच्या पात्रात अतिक्रमण केले आहे. या फार्म हाऊस मालकाने नदी पात्रातच संरक्षक भिंत उभारत पात्र बुजवण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे.

मिरकूटवाडी गावाच्या हद्दीतून जाणारी नदी पातळगंगा नदीला जाऊन मिळते. या नदीत कंपनी, फार्म हाऊस, हॉटेलसह अनेकांनी संरक्षण भिंती बांधल्या असल्याने नदी अरुंद होत आहे. पावसाळी पाण्याचा फटका नदी शेजारी असणार्‍या घरांना, शेतकर्‍यांना व रस्त्यांना बसत आहे. पाटबंधारे अधिकार्‍यांच्या दुर्लक्षपणामुळे आणि यांच्या आशिर्वादाने नदीत अतिक्रमण होत बिनधास्तपणे बांधकाम केली जातात का?असा संताप सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे.

- Advertisement -

खालापूर तालुक्यातून वाहणारे नैसर्गिक नाले आणि वालधुनी नदीची आधीच जलप्रदूषणामुळे दुरवस्था झाली आहे. नदी संवर्धन आणि नदी बचावासाठी एकीकडे काही संस्था नदी स्वच्छतेसारखे उपक्रम राबवत आहेत. मात्र, काही ठिकाणी शहरातून वाहणारे नैसर्गिक नाले आणि वालधुनी नदीच्या पात्रात सरकारी अनास्थेमुळे अतिक्रमणे वाढत नदीचा प्रवाह वळवत नाले, नद्यांचे अस्तित्व संपवण्याचा घाट घातला जात आहे.

पाली-खोपोली महामार्गालगत मीरकुटवाडी येथील एका फार्म हाऊस मालकाने आपली जमीन सपाट करण्यासाठी दगड, माती खोदून शेजारून वाहणार्‍या नदीत टाकली आहे. जमीन मालक अतिक्रमण करत संरक्षक भिंतीचे काम सुरू करण्याचा तयारीत आहे. तर अनेक मालक संरक्षण भिंत बांधून मोकळे झाले आहेत. तसेच या नदीत सिमेंटचे पाईप टाकून पुल बनविण्यात आलाआहे. हा पूल नक्की शासनाने बांधला आहे की खाजगी फार्म हाऊस मालकाने? यासाठी पाटबंधारे विभागाने मंजुरी दिली आहे का? पाटबंधारेचे अधिकारी तालुक्यात नक्की कोणते काम पाहतात? यांना नदी नाळे पाहण्यास वेळ नाही का? अतिक्रमामामुळे पुुराच्या पाण्याचा फटका बसून शेतीसह घरांना नुकसान झाल्यास लक्ष देणार का? असा सवाल ग्रामस्थांकडून विचारला जात आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -