घररायगडनागोठणेत मुस्लिम बांधवांचा शिवसेनेत प्रवेश; पदाधिकार्‍यांना दिले नियुक्ती पत्र

नागोठणेत मुस्लिम बांधवांचा शिवसेनेत प्रवेश; पदाधिकार्‍यांना दिले नियुक्ती पत्र

Subscribe

नागोठणे येथील मुस्लिम मोहल्ल्यातील अनेक महिलांसह तरुण तरुणी यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) प्रवेश करुन माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाला कदापि तडा जाऊ देणार नसल्याचे प्रतिपादन जिल्हा सहसंपर्क प्रमुख किशोर जैन यांनी येथे केले. यावेळी सरपंच डॉ. मिलिंद धात्रक,उपसरपंच रंजना राऊत,महिला आघाडी जिल्हाध्यक्षा दिपश्री पोटफोडे,महिला उपजिल्हा संघटिका दर्शना जवके, युवासेना जिल्हाधिकारी सचिन ढोबळे,युवती जिल्हाधिकारी धनवंती दाभाडे,महिला शहर संघटिका प्रणिता पत्कीयांच्यासह अनेक पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.

नागोठणे: येथील मुस्लिम मोहल्ल्यातील अनेक महिलांसह तरुण तरुणी यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) प्रवेश करुन माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाला कदापि तडा जाऊ देणार नसल्याचे प्रतिपादन जिल्हा सहसंपर्क प्रमुख किशोर जैन यांनी येथे केले. यावेळी सरपंच डॉ. मिलिंद धात्रक,उपसरपंच रंजना राऊत,महिला आघाडी जिल्हाध्यक्षा दिपश्री पोटफोडे,महिला उपजिल्हा संघटिका दर्शना जवके, युवासेना जिल्हाधिकारी सचिन ढोबळे,युवती जिल्हाधिकारी धनवंती दाभाडे,उप ता.प्रमुख गणपत म्हात्रे,शिवसेना विभागप्रमुख संजय भोसले, ग्रामपंचायत सदस्य मोहन नागोठणेकर तसेच सुप्रिया महाडीक,सुरेश जैन,ज्ञानेश्वर साळुंखे, वरवठणे सरपंच ऋतुजा म्हात्रे,शाखाप्रमुख धंनजय जगताप,महिला शहर संघटिका प्रणिता पत्की,युवासेना ता.समन्वयक शेखर जोगत,विभाग चिटणीस प्रणव रावकर,शाखाधिकारी दिनेश वादळ यांच्यासह अनेक पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.
इम्रान पानसरे,सोहेल पानसरे,समीर भिकन तसेच हुसेन पठाण यांच्या नेतृत्वाखाली मनगटावर शिवबंधन बांधून झालेल्या पक्ष प्रवेशानंतर झालेल्या कार्यक्रमात संघटनेत निवड झालेल्या पदाधिकार्‍यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.यावेळी जिल्हा सहसंपर्क प्रमुख जैन बोलत होते. यावेळी दीपश्री पोटफोडे,दर्शना जवके, सोहेल पानसरे यांनीही आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कीर्तीकुमार कळस आणि प्रकाश कांबळे यांनी केले.

समाजकारण आणि राजकारण करीत असताना कोणत्याही प्रकारचा पक्षपात व भेदभाव कधीच केला नसल्याने आपल्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून मोठ्या संख्येने मुस्लिम महिला व तरुण तरुणीनी पक्ष प्रवेश केला. नागोठण्यातील राजकारण करताना मुस्लिम बांधव सोबत होते.त्यांना दिलेला प्रत्येक शब्द मी पूर्ण केला. त्या विश्वासाचे फलित आज दिसत आहे.
– किशोर जैन
जिल्हा सहसंपर्क प्रमुख, शिवसेना (ठाकरे गट)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -