घररायगडआमदार भरत गोगावलेंनी महाडचा गड राखला!

आमदार भरत गोगावलेंनी महाडचा गड राखला!

Subscribe

३ ग्रामपंचायती ठाकरे गटाकडे

महाड-: रविवारी घेण्यात आलेल्या १३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा निकाल सोमवारी सकाळी जाहीर झाला. यापैकी १० ग्रामपंचायतीवर आमदार भरत गोगावले यांचे (10 ward win shinde group) वर्चस्व सिद्ध झाले आहे. रावढळ ग्रामपंचायतीवर नामदेव हरिश्चंद्र रेशीम, किंजलोळी खुर्दमध्ये कोमल गौरव भालेकर, कोथुर्डेमध्ये अंकुश लक्ष्मण पवार, काचलेमध्ये योगिता रुपेश केमडेकर, नेरावमध्ये बाबुराव सीताराम सुतार, तेलंगे मोहल्ला सुवर्णा महादेव धोंडगे, तेलंगेमध्ये सायली राकेश मनवे हे उमेदवार विजयी झाले.  उर्वरित ३ ग्रामपंचायती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे  (3 ward win shinde group) यांच्या गटाकडे गेल्या आहेत. यातील बावळे ग्रामपंचायतीमध्ये केवळ सदस्य पदासाठी निवडणूक घेण्यात आली होती. 

तालुक्यामध्ये २१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. यातील ८ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने शेल, चांढवे बुद्रुक, किंजळोली खुर्द, कोतुर्डे, तळोशी, नांदगांव बुद्रुक, नेराव, टोळ बुद्रुक, तेलंगे, तेलंगे मोहल्ला, रावढळ आणि बावले आशा १३ ग्रामपंचायतींमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली. सोमवारी सकाळी मतदानाचा निकाल जाहीर करण्यात आला. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकामध्ये सकाळी १० वाजता या मतमोजणी प्रक्रियेस सुरुवात झाली. सहा टेबलांवर मतमोजणी करण्यात आली. याकरिता जवळपास ६० कर्मचारी आणि ८० पोलीस बंदोबस्ताकरिता तैनात होते.निकाल जाहीर होतात विजयी उमेदवारांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकच जल्लोष साजरा केला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला होता.

- Advertisement -

बुद्रुक ग्रामपंचायत  हातातून गेली
१० ग्रामपंचायतींवर आमदार भरत गोगावले यांनी आपल्या शिंदे गटाच्या शिवसेनेचे वर्चस्व कायम ठेवले आहे. यातील प्रतिष्ठेची असलेली टोळ बुद्रुक ग्रामपंचायत शिंदे गटाच्या हातातून गेली आहे. या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने विजय प्राप्त केलेला आहे. 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -