घररायगडरायगडमध्ये भाजपाचा दिवाळी धमाका!

रायगडमध्ये भाजपाचा दिवाळी धमाका!

Subscribe

माजी आमदार सुरेश लाड भाजपात जाणार

खोपोली-: कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निष्ठावंत पाईक म्हणून ओळखले जाणारे माजी आमदार सुरेश लाड (Ex mla suresh lad entry Bjp) भाजपाच्या गळला लागले आहेत. लाड गुरुवारी (9) मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. 

त्यामुळे या मतदारसंघासह संपूर्ण रायगड जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे. दुपारी ३ वाजता हा पक्ष प्रवेश सोहळा होणार असून, खालापूरसह कर्जत तालुक्यातील अनेक नेतेही भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. रायगडचे खासदार आणि अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि सुरेश लाड यांची मैत्री जगजाहीर होती. मात्र २०१९ नंतर या मैत्रीला तडे गेले आणि ४० वर्षांची मैत्री संपुष्टात आली. तटकरे आणि लाड यांच्यात दरी निर्माण झाल्यानंतर लाड भाजपमध्ये जातील, अशी चर्चा होती. मात्र त्यांनी आपण कुठेही जाणार नसल्याचे स्पष्ट केले होते.

  • अचानक मतपरिवर्तन झाले                                                                                                राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतही लाड शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहिले. परंतु त्यांचे अचानक मतपरिवर्तन झाले आहे. राज्यात तीन पक्षांचे सरकार असल्याने विरोधी पक्षांतील कार्यकर्त्यांची कामे होत नसल्यामुळे लाड यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जाते.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -