घरठाणेशिवसेनेच्या शाखेचा पुनर्विकास डोळ्यात खुपतो का? शिंदे गटाचा ठाकरे गटाला सवाल

शिवसेनेच्या शाखेचा पुनर्विकास डोळ्यात खुपतो का? शिंदे गटाचा ठाकरे गटाला सवाल

Subscribe

मुंबई : ठाण्याच्या मुंब्र्यातील ठाकरे गटाच्या शाखेवर शिंदे गटाने आठवडाभरापूर्वी बुलडोझर चालवून ती शाखा भुईसपाट केली होती. त्यावरून वादंग निर्माण झाला होता. आता त्या ठिकाणी मोठी इमारत उभारली जाणार असून यावरूनच शिवसेनेच्या शाखेचा पुनर्विकास डोळ्यात खुपतो का? असा सवाल करत शिंदे गटाने ठाकरे गटाला डिवचले आहे.

हेही वाचा – सरवणकरांच्या नियुक्तीमुळे पोट दुखत असेल तर…; केसरकरांचा आदित्य ठाकरेंना टोला

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्ती म्हणून ओळख असलेले राजन किणे यांच्या नेतृत्वाखाली 40 ते 50 जणांच्या जमाव 2 नोव्हेंबर रोजी ठाकरे गटाच्या मुंब्रा येथील शाखेत घुसला होता. यावेळी ठाकरे गटाच्या शाखाप्रमुखाला बाहेर काढले. तसेच शाखेवरील बोर्डही हटवून शिंदे गटाचा बोर्ड लावला होता. त्यानंतर बुलडोझर चालवून ही शाखा उद्ध्वस्त करण्यात आली आणि त्या ठिकाणी नवीन इमारत उभी करणार असल्याचे स्पष्ट शिंदे गटाने केले होते.

- Advertisement -

याबाबत शिंदे गटाने पुन्हा ठाकरे गटावर टीकास्त्र सोडले आहे. ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथे असलेल्या शिवसेनेच्या शहर शाखेसह आसपासची जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शहरप्रमुखाने भाड्याने दिली होती. शाखेच्या बाहेरच सर्व्हिसिंग सेंटर, बाजूला गॅरेज, मागच्या बाजूला बांधकाम साहित्याचा व्यवसाय यांना जागा देऊन हा शहरप्रमुख शाखेच्या नावावर भाडे खात होता. धर्मवीर आनंद दिघे यांनी उभारलेल्या या शाखेची मागील काही दिवसांत जीर्ण अवस्था झाली होती. मात्र त्याकडेही कुणीही लक्ष देत नसल्याने अखेर शिवसैनिकांनी ही शाखा ताब्यात घेतल्याचे शिंदे गटाने म्हटले आहे.

हेही वाचा – मुंबई आणि परिसरात 477पैकी केवळ 12 ‘आरोग्यवर्धिनी केंद्र’ झाली सुरू, ठाकरे गट आक्रमक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शाखांना नवसंजीवनी देण्याच्या अभियानांतर्गत या ठिकाणी एक सुसज्ज शाखा उभारण्यासाठी भूमिपूजन करण्यात आले. मात्र आधीपासून डोळ्यात खुपत असलेल्या आनंद दिघे यांच्या शाखेचा पुनर्विकास होत असल्याने काही जणांना पोटदुखी सुरू झाली आणि शाखा पाडल्याचा कांगावा त्यांनी सुरू केला. शिवसेनेच्या शाखेचा पुनर्विकास डोळ्यात खुपतो का? की अजूनही धर्मवीर आनंद दिघे साहेब डोळ्यात खुपतात? असा सवाल शिंदे गटाने केला आहे.

तुम्ही कितीही कांगावा करा, पण जिथे ही शाखा होती, त्याच जागेवर पुन्हा एकदा सुसज्ज शिवसेना शाखा उभी राहील आणि त्यातून व्यवसाय नव्हे, तर 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारणाची शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण अंगीकारून कामे होतील, असा दावाही शिंदे गटाने केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -