घररायगडखोपोली स्थानकात सीसीटीव्ही नसल्याने गुन्हेगार मोकाट

खोपोली स्थानकात सीसीटीव्ही नसल्याने गुन्हेगार मोकाट

Subscribe

परिसरातील कारखानदारीमुळे खोपोली शहरात आणि आसपासच्या परिसरात बाहेरून कारखान्यात काम करण्यासाठी आलेले लोक मोठ्या प्रमाणात राहत असतात. बाहेरून आलेल्या लोकांची कोणत्याही प्रकारची चौकशी न करताच त्यांना कारखान्यात सामावून घेतले जात आहे.

रायगड जिल्हयातील खोपोली शहराची औद्योगिक वसाहत म्हणून ओळख असल्याने याठिकाणी मोठया प्रमाणावर बाहेरील लोकांची वर्दळ पहायला मिळते. तसेच खोपोली शहरात येण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल व कर्जत रेल्वे स्टेशन येथून दिवस -रात्र रेल्वची सेवा सुरू असल्यामुळे या प्रवासाचा फायदा बाहेरील कामगार तसेच शाळा, कॉलेज व इंजिनिअर कॉलेजमधील मुले, मुली घेत असतात. याचाच गैरफायदा चोरट्यांनी घेतला आहे. या ठिकाणी गुन्हेगारी वाढल्याचे दिसून येत आहे.

नुकतेच झालेले अल्पवयीन मुलाचे अपहरण, चोरी,घरफोड्या अशा विविध गुन्ह्यांची नोंद खोपोली पोलीस ठाण्यात झाली आहे.यातील अनेक गुन्हे खोपोली शहरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमुळे उघडकीस आलेले आहेत. परंतु खोपोली रेल्वे स्टेशनवर तसेच स्टेशन परिसरात अद्याप सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात आलेली नाही. गुन्हेगार गुन्हा केल्यानंतर पळून जाण्यासाठी रेल्वेचा वापर करतात. परंतु रेल्वे स्थानकावर सीसीटीव्ही नसल्याने गुन्हेगारांचा मार्ग सुखकर असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे स्थानकावर आणि स्थानक परिसरात सीसीटीव्ही लावण्याची मागणी केली जात आहे.

- Advertisement -

पोलिसांना गुन्ह्याचा शोध घेण्यासाठी रेल्वेच्या परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेराचा उपयोग होऊ शकतो. पोलिसांना खोपोली किंवा आसपासच्या परिसरात बाहेरून येऊन गुन्हा करून रेल्वेने पळणार्‍या गुन्हेगारांचा शोध घेण्यास चांगलीच मदत होईल. यासाठी रेल्वे प्रशासनाने खोपोली रेल्वे स्थानक परिसरात तरी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे गरजेचे असल्याची चर्चा होत आहे.

परिसरातील कारखानदारीमुळे खोपोली शहरात आणि आसपासच्या परिसरात बाहेरून कारखान्यात काम करण्यासाठी आलेले लोक मोठ्या प्रमाणात राहत असतात. बाहेरून आलेल्या लोकांची कोणत्याही प्रकारची चौकशी न करताच त्यांना कारखान्यात सामावून घेतले जात आहे. अनेक वेळा पोलिसांनी बाहेरील कामगाराच्या वर्तणुकीचे प्रमाणपत्र मागितले किंवा भाडोत्री ठेवणार्‍याला भाडेकरूंची माहिती मागितली की त्यांच्याकडे कसलीच माहिती नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले दिसत आहे. खोपोली रेल्वे स्थानक आणि परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने चोरटे बिनदिक्कत पळून जाण्यात यशस्वी होतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -