घररायगडअनधिकृत होर्डिंग्जवर पनवेल महापालिकेची कारवाई

अनधिकृत होर्डिंग्जवर पनवेल महापालिकेची कारवाई

Subscribe

मागील महासभेमध्ये जाहिरात धोरण जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार चारही प्रभागांमधील अनधिकृत होर्डिंग्जची यादी तयार करण्यात आली असून त्यानुसार कारवाई करण्यास सुरूवात झाली आहे.

पनवेल महापालिका क्षेत्रात दिवसेंदिवस अनधिकृत होर्डिंग्जची संख्या वाढत असल्याने शहराचे विद्रुपीकरण होत आहे. या होर्डिंग्जवर कारवाई करण्याचे आदेश आयुक्त गणेश देशमुख यांनी दिले आहेत. त्याप्रमाणे पनवेल महापालिकेच्या चारही प्रभागामध्ये अनधिकृत होर्डिंग्जवरमहापालिकेकडून कारवाई करण्यात येत आहे.

मागील महासभेमध्ये जाहिरात धोरण जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार चारही प्रभागांमधील अनधिकृत होर्डिंग्जची यादी तयार करण्यात आली असून त्यानुसार कारवाई करण्यास सुरूवात झाली आहे. नुकतीच प्रभाग ‘अ’खारघर येथील सेक्टर १५, प्लॉट नंबर २५ येथील अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई करण्यात आली. यावेळी उपायुक्त कैलास गावडे, सहाय्यक आयुक्त वंदना गुळवे, सहाय्यक आयुक्त सुवर्णा दखणे व तसेच पनवेल महानगरपालिकेचे सर्व प्रभाग अधिकारी उपस्थित होते. पोलिसांचीही या कामात मदत घेतली जात आहे.

- Advertisement -

तळोजा-पाचनंद येथील सेक्टर ४०, सेक्टर ११ धील फेज १ रोड मधील अनधिकृत होर्डिंग्ज वर २४ फेब्रुवारीला कारवाई करण्यात आली. या कारवाई अंतर्गत अनधिकृत होर्डिंग्जचे स्ट्रक्चर गॅस कटरच्या सहाय्याने कापून कायमस्वरूपी तोडण्यात आले. त्याबरोबरच २५ फेब्रुवारीला तळोजा येथील पेटाली येथील अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई करण्यात आली. यावेळी जवळपास दहा होर्डिंग्जवर कारवाई करून ती कायमस्वरूपी काढण्यात आली. खारघर प्रभागातील कारवाईनंतर इतर प्रभागातील होर्डिंग्जवर कारवाई करण्यात येणार आहे.

महापालिकेने जाहिरात पॉलिसी तयार केली असल्याने होर्डिंग्ज लावण्यापूर्वी जाहिरातदाराने रितसर पालिकेची परवानगी घेणे गरजेचे आहे. यापुढे जाहिरातदारांनी महापालिकेची रितसर परवानगी न घेता होर्डिंग्ज लावल्यास अशा होर्डिंग्जवर कारवाई करण्यात येणार आहे.
– कैलास गावडे, उपायुक्त, पनवेल महापालिका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -