घरमहाराष्ट्रकोकणRaigad Pen Fruit News : पारा वाढला, फळे स्वस्त झाली

Raigad Pen Fruit News : पारा वाढला, फळे स्वस्त झाली

Subscribe

उष्णतेमुळे फळांना वाढती मागणी असून फळांची आवक वाढल्याने फळेही स्वस्त झाली आहेत. त्यामुळे पेणकरांना कडाक्याच्या उन्हाळ्यात स्वस्त फळे मिळू लागली आहेत.

मितेश जाधव : आपलं महानगर वृत्तसेवा

पेण : उन्हाळा दिवसेंदिवस कडक होत असल्याने रसाळ फळे, उसाचा रस, ताक, लस्सी आदी पेयांना पसंती मिळत आहे. त्यातच पेणमधील घाऊक फळ बाजारात मोठ्या प्रमाणात फळे विक्रीसाठी दाखल होत असल्याने फळांचे दर सामान्यांच्या आवाक्यात आले आहेत. बाजारात येणाऱ्या फळांचा रंग, दर्जा, चव उत्तम असल्याने ही फळे पेणकरांच्या पसंतीस उतरली आहेत.

सध्या फळांचा राजा आंबा बाजारात दाखल झाला आहे. ३५० ते ४०० रुपये डझन भावाने आंबा मिळत आहे. कलिंगड स्वस्त फळ शिवाय उन्हाळ्यात अतिशय उत्तम असल्याने बाजारात कलिंगडांना चांगलीच मागणी आहे. सफरचंदपासून पपईपर्यंत सर्वच फळे बाजारात उपलब्‍ध असून त्यांचे दरही थोडे कमी झाल्याने ग्राहकही सुखावले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा… Raigad Alibaug Crime News : चक्री जुगार अड्ड्यांवर कुणाचा वरदहस्त?

दरवर्षी नोव्हेंबरपासून बाजारात फळे येण्यास सुरुवात होते. आता आंबे, द्राक्ष यांच्यासह पपई, पेरु, चिक्कू, कलिंगड, खरबूज या फळांची बाजारात चांगलीच आवक आहे. सफरचंदचा भाव १८० रुपये किलो आहे. मोठा कलिंगड ५० ते ८० रुपयांना आणि लहान कलिंगड ३० रुपयांना मिळतो. सध्या रसभरे जाम ग्राहकांना आकर्षित करत आहेत. या शिवाय करवंद, जांभुळ हा रानमेवा, आंबा, फणसाचे गरे, ताडगोळे, नारळपाणी यांना ग्राहकांकडून पसंती मिळत असल्याने यांचीही मागणी वाढली आहे.

- Advertisement -

हेही वाचा… Raigad Water Crisis : कर्जतमध्ये जलजीवन मिशन योजनांची झाडाझडती

फळांचे दर

  • पपई (लहान) – ३० रुपये
  • पपई (मोठा) – ६० रुपये
  • जांब – २० ते २५ रु. वाटा
  • फणसाचे गरे – २०० रुपये किलो
  • ताडगोळे – ५० रुपये (पाच नग)
  • केळी – ३० ते ४० रुपये डझन
  • चिक्कू प्रतिकलो – ६० रुपये
  • मोसंबी – ‌१२० रु. किलो
  • खरबूज – ३० रुपये नग
  • द्राक्ष – ८० रुपये किलो
  • सफरचंद – १६० ते १८० रु. किलो
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -