घररायगडशेतकर्‍यांची पेरणीपूर्व मशागतीची कामाची लगबग; भात बियाणे खरेदी करण्याचे आवाहन

शेतकर्‍यांची पेरणीपूर्व मशागतीची कामाची लगबग; भात बियाणे खरेदी करण्याचे आवाहन

Subscribe

तालुक्यात बाराही महिने शेतकरी भाजीपाला,भातशेती तसेच विविध पीक घेत असून खरीप हंगामात प्रमुख भात पिके घेतली जातात. त्यामुळे शेतकरी एकीकडे भात पेरणीपूर्व मशागतीची कामे सुरू आहेत तर दुसरीकडे वेलवर्गीय भाज्यांची लागवड सुरू आहे. जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत शेतकरी डोक्यावर पाणी घेऊन वेलवर्गीय भाज्यांना पाणी देत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, शेतकर्‍यांची पेरणीपूर्व मशागतीची कामाची लगबग सुरु असून भात बियाणे खरेदी करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

पेण : मितेश जाधव

जिल्ह्यात भातशेतीही शेतकर्‍याचा प्रमुख साधन आहे. त्यामुळे जिल्ह्यात भात बियाण्याची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जात आहे. यामहिन्यात शेतकरी कृषी सेवा केंद्रास भेट देऊन भाजीपाला बियाणे, भात बियाणे, खत खरेदी करण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात प्रामुख्याने भातशेती १ लाख ६० हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड केली जाते आहे. सरासरी अंदाजे नागलीची लागवड ५५०० हजार हे क्षेत्रावर केली जात आहे.
जिल्ह्यात शेतकरी पेरणीपूर्वी मशागतीची कामे बांध बंदिस्ती करणे, जमीन स्वच्छ करणे, यासारखी कामे सुरू झाले आहेत. शेतकरी यंत्राच्या साह्याने जमिनीची नांगरणी असे कामात शेतकरी बांधव मग्न झाला आहे तर काही ठिकाणी पेरणीपूर्व कामे पूर्ण झाल्यानंतर शेतजमिनीत भाताची पेरणी कडे शेतकर्‍यांनाची लगबग सुरू झाली आहे कृषी विद्यापीठाच्या मान्यताप्राप्त भात बियाणे कृषी व केंद्रांमध्ये विक्रीसाठी आली आहेत, त्याच पद्धतीने बियाणे खरेदी करणे असे कृषी विभागाने आवाहन केले आहे. भातपिकावर बरोबर डोंगरभागात दुय्यम पीक म्हणून नाचणी या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात करत असतात त्यामुळे शेतकर्‍यांची बियाणे खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे. सध्या जिल्ह्यात भात बियाण्यांची विक्री ८९४० क्विंटल झाल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.

जिल्ह्यातखरीप हंगामात बैठक घेऊन खत बियाणे शेतकर्‍यांना वेळेत पुरवठा करण्याचे नियोजन केले आहे. सध्या जिल्ह्यात भरपूर प्रमाणात बियाणे आणि खते उपलब्ध आहेत. बियाणे तसेच खते विक्री करताना शेतकरी बांधवांची फसवणूक आणि गैरसोय होणार नाही याची काळजी खत बियाण विकेेत्यांनी घ्यावी.
– जी. आर. मुरकुटे
निरिक्षक, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण

- Advertisement -

हवामान खात्याने यावर्षी पाऊस ८ ते १० दिवस उशीरा होणार असल्याचे सांगितल्याने शेतकर्‍यांनी पावसाचा अंदाज घेऊन भाताची पेरणी करावी अथवा घाई करू नये. युरिया खताचा संतुलित वापर करावा, नॅनो युरिया खते वापरण्याकडे जातीने लक्ष द्यावे. निविष्ठा विक्रीता शेतकरी बांधवाची फसवणूक करत असेल तर कृषी विभागात मध्ये संपर्क साधा.
– मिलिद चोधरी
कृषी विकास अधिकारी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -