घररायगडउरण पिरवाडी किनार्‍याला धुपरोधी बंधारा, नागरिकांनी मानले बंदर विभागाचे आभार

उरण पिरवाडी किनार्‍याला धुपरोधी बंधारा, नागरिकांनी मानले बंदर विभागाचे आभार

Subscribe

पुणे येथील केंद्रीय जल आणि विद्युत अनुसंधान शाखेने २०१२ मध्ये पीरवाडी समुद्राच्या लाटांच्या पाण्याचा अभ्यास केला होता. त्यानुसार मेरीटाईम बोर्ड मुंबई आणि पत्तन विभागाने सदरचे काम नुकतेच पुर्ण केले आहे. विशेष म्हणजे स्थानिकांनी सदर काम हे मजबूत व दर्जेदार होण्यासाठी जातीने लक्ष देत ठेकेदाराकडून काम करून घेतले आहे.

उरणच्या निसर्गात भर टाकणारा पिरवाडी समुद्रकिनारा पर्यटनासाठी आकर्षित करणारा किनारा आहे. यामुळे येथे मुंबई, नवी मुंबईसह अनेक ठिकाणाहून पर्यटक येत असतात. मात्र, गेली अनेक वर्ष किनार्‍याची धूप होत होती.सुमारे १३०० मीटर किनार्‍याची धूप होऊन किनार्‍यावरील नारळी फोफळीच्या बागा, गावातील शेत जमिनी व गोड्या पाण्याच्या विहीरी नष्ट होण्याच्या मार्गावर होत्या. गावामध्ये समुद्राचे पाणी येऊ नये म्हणून धूप प्रतिबंधक बंधारा व्हावा ही मागणी २०११ पासून नागाव ग्रामस्थांनी लावून धरत उपोषण व आंदोलने केली होती. या आंदोलनांना अखेर यश आले असून पीरवाडी समुद्र किनारी गतवर्षीपासून बंधार्‍याचे काम सुरू झाले आहे.

पुणे येथील केंद्रीय जल आणि विद्युत अनुसंधान शाखेने २०१२ मध्ये पीरवाडी समुद्राच्या लाटांच्या पाण्याचा अभ्यास केला होता. त्यानुसार मेरीटाईम बोर्ड मुंबई आणि पत्तन विभागाने सदरचे काम नुकतेच पुर्ण केले आहे. विशेष म्हणजे स्थानिकांनी सदर काम हे मजबूत व दर्जेदार होण्यासाठी जातीने लक्ष देत ठेकेदाराकडून काम करून घेतले आहे. गतवर्षी आलेले महाभयानक तोक्ते व निसर्ग वादळाच्या महाकाय लाटा या बंधार्‍याने सहजपणे झेलत त्याची कणखरता सिद्ध केली.

- Advertisement -

हा धुप प्रतिबंधक बंधारा एक मजबूत, टिकाऊ दर्जाचा असल्याने नागावकरांचे बांधबंदिस्त मजबूत होऊन शेतजमीनी व पिण्याच्या पाण्याचे स्तोत्र संरक्षित झाले आहे. त्यामुळे पीरवाडी किनारा हा पर्यटकांना भुरळ पाडत असूनपर्यटकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. बंधार्‍याचे काम उत्कृष्ट झाल्याने नागावमधील स्थानिक रहिवाशांनी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, पत्तन विभाग, बंधार्‍याच्या कामाचे अभियंता व बंदर विकास मंत्रालयाचे आभार मानले आहेत.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -