घररायगडमुरुड तालुक्यात कोरोना रुग्ण संख्येत वाढ

मुरुड तालुक्यात कोरोना रुग्ण संख्येत वाढ

Subscribe

कोर्लई, निडी गाव प्रतिबंधित क्षेत्र

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा प्रभाव मुरुड तालुक्यात दिसून येत असून, वाढती रुग्ण संख्या लक्षात घेऊन कोर्लई, निडी गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. तसेच राजपुरी, एकदरा गावात रुग्ण संख्या वाढत असल्याने गावांची स्क्रिनिंग तपासणी करण्यात येत आल्याची माहिती तहसीलदार गमन गावित यांनी दिली. तालुक्यातून कोरोनाचे उच्चाटन करण्यासाठी जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

कोर्लई, निडी आणि राजपुरी भागात तहसीलदार गावित यांनी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर खबरदारची उपाययोजना म्हणून कोर्लई, निडी गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले. गर्दीमुळे कोविड रुग्ण संख्या वाढत असल्याचे समोर आले असल्याने नागरिकांनी विवाह समारंभापूर्वी होणारा हळदीचा कार्यक्रम रद्द करावा, असे आवाहन गावित यांनी केले आहे. शासनाने आखून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून स्वतःसह कुटुंबियांचीसुद्धा काळजी घ्यावी, असेही ते म्हणाले. कोरोनाला रोखण्यासाठी ग्रामसमितीन्यांही प्रभावी जनजागृती करण्याची सूचना त्यांनी केली.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -