घररायगडकर्जत येथे शिवसेना शिंदे गटाच्या महिलांची आढावा बैठक

कर्जत येथे शिवसेना शिंदे गटाच्या महिलांची आढावा बैठक

Subscribe

पदनियुक्तीचे पत्र देऊन संघटनात्मक मार्गदर्शन

कर्जत-:
कर्जत श्रीराम पुल येथे शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या संपर्क कार्यालयात महिलांची आढावा बैठक संपन्न झाली. ( Review meeting of Shiv Sena Shinde group women) या बैठकीत शिवसेना उपनेत्या रायगड जिल्हा संपर्क प्रमुख शिला देशमुख, मावळ लोकसभा संपर्क प्रमुख नम्रता भोसले यांच्या हस्ते महिलांना पदनियुक्त पत्र देण्यात आले. त्याच प्रमाणे महिलांना मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी आमदार महेंद्र थोरवे, जिल्हा संपर्क प्रमुख संतोष भोईर, तालुका प्रमुख संभाजी जगताप, रायगड सल्लागार सुरेखा शितोळे, तालुका संघटक रेश्मा म्हात्रे, शहर संघटक भारती शिंदे, तालुका संपर्क प्रमुख आशा पालकर, शहर संपर्क प्रमुख सायली शहासने, ज्योती कुळकर्णी, माजी सभापती आरती भगत आदी उपस्थित होत्या.

- Advertisement -

यावेळी नीलम चोरगे, सुरेखा खेडेकर,नगरसेविका सुप्रिया साळुंखे,वैजयंती ठाकूर, सुमन भोईर, कविता जाधव, प्रिया रसाळ, प्रिया कोळंबे, निता शिंदे, नदिनी देशमुख, सोनू येरुंनकर, मनीषा ठोंबरे, अरुणा मोरे, सुरेखा पिंगळे, नयना भोईर, आरती तिखंडे, हर्षदा पडवळ, संगीता वाघमारे , रोहिणी शिंदे, प्रयांका भालेराव, विद्या गायकवाड, सुगंधा गायकवाड, दक्षता देशमुख, शोभा कोरडे, राजश्री हजारे आदी उपस्थित होते.


गौरकमथ शाखा प्रमुखपदी नयना भोईर, उपशाखा प्रमुखपदी हर्षदा जाधव, वेणगाव शाखा प्रमुखपदी अर्चना चौधरी, उपशाखाप्रमुखपदी नीलम पालकर, संत रोहिदासनगरच्या शाखा प्रमुखपदी अनिषा गायकवाड, विद्या गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे. तर ग्रामपंचायत प्रमुखपदी सुंगधा गायकवाड, शाखा प्रमुख प्रियांका भालेराव, उपशाखा प्रमुख रोहिणी शिंदे, आदिवासीवाडी शाखा प्रमुखपदी संगीता गणेश वाघमारे व उप शाखाप्रमुख संगीता वसंत वाघमारे त्याच प्रमाणे सरिता (लाडीवली-ग्रा.पं.प्रमुख), जोत्स्ना बैलमारे (लाडीवली-शाखा प्रमुख), आशा पवार (उप शाखाप्रमुख), आरती तिखंडे (तिवरे-शाखा प्रमुख),हर्षदा पडवळ (उप शाखाप्रमुख) आदी महिलांना नियुक्ती करण्यात आली असून मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.

- Advertisement -

पक्षाकडून कार्यकर्त्याला पद दिले जाते तेव्हा त्या पदाची जबाबदारी लक्षात घेऊन त्याप्रमाणे कामाला लागले पाहिजे. त्या पदाचा वापर गोर गरिब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी तसेच पक्ष संघटन भक्कम आणि वाढीसाठी केला पाहिजे.
-शिला देशमुख, उपनेत्या, जिल्हा संपर्क प्रमुख.

महिला आज सर्वच क्षेत्रात पुढे आहेत. महिला जर घर उत्तम प्रकारे सांभाळू शकतो तर पक्ष का नाही. पद नियुक्त महिला या उत्तम प्रकारे पक्षाची जबाबदारी पार पाडतील, असा माझा विश्वास आहे.
-नम्रता भोसले, मावळ लोकसभा संपर्क प्रमुख.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -