घररायगडशालेय शिक्षक झाला शिक्षणमंत्र्यांच्या कार्यालयाचा सेवक

शालेय शिक्षक झाला शिक्षणमंत्र्यांच्या कार्यालयाचा सेवक

Subscribe

रायगड जिल्हा परिषदेचा प्रताप आरटीआयमधून उघड

अलिबाग-;
आधीच शिक्षकांची कमतरता असल्याने शिक्षण विभागाचा बोजवारा उडालेला असताना रायगड जिल्हा परिषदेचा अजब कारभार उजेडात आला आहे. (A school teacher became a servant of the Education Minister’s office) रायगडमधील एका शिक्षकाचा शिक्षणमंत्र्यांच्या कार्यालयीन कामासाठी गैरवापर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अलिबागमधील आरटीआय कार्यकर्ते संजय सावंत यांनी मंत्री शिक्षकांच्या सेवांचा गैर शैक्षणिक कारणांसाठी वापर होत असल्याची गंभीर बाब निदर्शनास आणली आहे.

एकीकडे रायगड जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये रिक्त असलेल्या शिक्षकांच्या जागेवर सेवा निवृत्त झालेल्या १६९ शिक्षकांची तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचवेळी शाळेवरील नियमीत शिक्षकाची प्रतिनियुक्ती चक्क शिक्षणमंत्री यांच्या मागणीवरून त्यांच्या कार्यालयात झाल्याने शैक्षणिक क्षेत्रात संतापाची लाट पसरली आहे.

- Advertisement -

सावंत यांना मिळालेल्या माहिती नुसार राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी २७ सप्टेंबर २०२२ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद यांना पत्र देऊन डॉ.महेंद्र गुणाजी शिर्के, शिक्षक प्राथमिक शाळा, कांबळे/बिरवाडी, ता.महाड यांची सेवा उसनवारी, प्रतिनियुक्तीवर शिक्षणमंत्री यांच्या कार्यालयात वळते करण्यास फर्माविले. त्यानंतर मंत्रालयाच्या ग्रामविकास विभागानेही ३० नोव्हेंबर २०२२ रोजी अशाच प्रकारचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद यांना दिले. त्यानुसार मुख्याधिकार्‍यांनी ९ डिसेंबर २०२२ रोजी प्रतिनियुक्ती आदेश पारित करून शिक्षक डॉ.महेंद्र गुणाजी शिर्के यांची प्रतिनियुक्ती शिक्षणमंत्री यांच्या कार्यालयात करून त्यांना कार्यमुक्त केले आहे, अशी माहिती सावंत यांना माहिती अधिकारातून समोर आणली आहे.
या घटनेमुळे शैक्षणिक समुदायामध्ये संतापाची लाट पसरली आहे, अनेकांनी सार्वजनिक संसाधनांच्या गैरवापराबद्दल चिंता व्यक्त केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी सावंत यांनी केली आहे.

शासनाच्या आदेशा प्रमाणे सदरचे प्रतिनियुक्ती आदेश काढण्यात आला आहे. प्राथमिक शिक्षक डॉ.महेंद्र गुणाजी शिर्के हे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यालयात कार्यरत आहेत.
– पुनीता गुरव, शिक्षणाधिकारी प्राथमिक, राजिप.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -