घररायगडसहकाराच्या माध्यमातून सरकार देणार कृषी क्षेत्राला बळ; मंत्री अतुल सावे यांचे प्रतिपादन

सहकाराच्या माध्यमातून सरकार देणार कृषी क्षेत्राला बळ; मंत्री अतुल सावे यांचे प्रतिपादन

Subscribe

अलिबाग कृषी प्रधान देश अशी भारताची असणारी ओळख टिकविण्यासाठी केंद्र सरकारच्या मदतीने महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना साधन बनविण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकण्यात आले आहे. सहकार क्षेत्राच्या माध्यमातून शेतकर्‍यांना मोफत भांडवल देऊन त्यांचे अतिरिक्त उत्पन्न वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. यासाठी राज्यातील प्रत्यक्ष गावात शेतकर्‍यांची सोसायटी उभारण्यात येणार आहे.

अलिबाग कृषी प्रधान देश अशी भारताची असणारी ओळख टिकविण्यासाठी केंद्र सरकारच्या मदतीने महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना साधन बनविण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकण्यात आले आहे. सहकार क्षेत्राच्या माध्यमातून शेतकर्‍यांना मोफत भांडवल देऊन त्यांचे अतिरिक्त उत्पन्न वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. यासाठी राज्यातील त्यक्ष गावात शेतकर्‍यांची सोसायटी उभारण्यात येणार आहे. या सोसायट्यांना केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून आर्थिक मदत केली जाणार असून शेतकर्‍यांच्या शेतातील उत्पादने नाबार्ड खरेदी करणार आहे. सहकार क्षेत्रामधून राज्यातील कृषी क्षेत्राला बळ देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे सहकार तथा ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे यांनी केले.
यावेळी आमदार मनीषा चौधरी , माजी आमदार चंद्रकांत मोकल , कृषिभूषण जयंत चौधरी , रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी मंदार वर्तक , कृषक महोत्सवाचे अध्यक्ष द्वारकानाथ नाईक, आवास ग्रामपंचायत सरपंच अभिजित राणे, रणजित राणे, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते सुरेंद्र म्हात्रे, अविनाश राऊळ, श्रीनाथ कवळे, महादेव शेट्ये, आरसीएफचे श्रीनिवास कुलकर्णी , वैभव वझे , रवींद्र वर्तक, रमेश नाईक, कविता राणे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. क्षात्रैक्य कृषक महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी सहकार तथा ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे बोलत होते.

कोकणातील शेतकरी कृषक महोत्सवात दाखल झाले आहेत. या महोत्सवातून तरुणाईला शेतीचे महत्व पटवून देऊन त्यांचे कृषी बाबतचे विचार सकारात्मक करण्यासाठी चर्चासत्रांची जोड मिळणार आहे. अ‍ॅग्रो टुरिझमच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात नवी चळवळ उभी राहत आहे. यासाठी तरुणांचे प्रबोधन करण्यात येणार आहे. शेतीचे क्षेत्र कमी असलेतरी पारंपरिक पद्धतीला तंत्रज्ञानाची जोड देऊन प्रयोगशील शेतकरी बनण्याचे दरवाजे खुले होतात. कृषी क्षेत्र टिकून राहावे यासाठी अलिबाग तालुक्यात पुढील तीन महिन्यात कायमस्वरूपी कृषी प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे. असे कृषक महोत्सवाचे कार्याध्यक्ष प्रदीप नाईक यांनी सांगितले.

- Advertisement -

ओबीसी समाजाच्या कल्याणासाठी अनेक निर्णय
ओबीसी समाजाच्या कल्याणासाठी सरकारने अनेक निर्णय घेऊन दिलासा दिला आहे. ओबीसी कल्याण मंत्रालयाच्या महाज्योती मधून एमपीएससी आणि यूपीएससी या परीक्षांसाठी तब्बल १५०० विद्यार्थ्यांना संधी दिली आहे. पीएचडीसाठी १२३८ विद्यार्थ्यांना तर परदेशात शिक्षणासाठी जाणार्‍या ५० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर केली आहे. शिक्षण क्षेत्रात ओबीसी घटक मागे पडू नये यासाठी ७३ वसतिगृह उभारण्यात येणार आहेत. त्याचबरोबर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास विद्यार्थ्यांना करता यावा यासाठी महाज्योतीच्या माध्यमातून प्रत्येक गावात ग्रंथालय उभारण्यात येणार असल्याचे सहकार तथा ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे यांनी सांगितले.

शेतकर्‍यांच्या कर्जाचा बोजा उतरवला
शेतकर्‍यांना सक्षम करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रयत्नशील आहे. शेतकर्‍यांचे हित लक्षात घेऊन सरकारने राज्यातील शेतकर्‍यांच्या तब्बल ६९ हजार हेक्टरवर असणारा कर्जाचा बोजा उतरवला आहे. आता कृषी क्षेत्राचे महत्व आजच्या तरुण पिढीला समजावण्याची गरज बनली आहे. शेतकर्‍याच्या मुलाला शेतीत रस राहिलेला नाही. पैसे मिळेल म्हणून ग्रामीण भाग सोडून शहराकडे तरुणाईची पाऊले पडली आहेत. या तरुणांचे शेतीबद्दलची विचार कृषी महोत्सवातून सकारात्मक करण्याची गरज निर्माण झाली आहे, असेही मंत्री अतुल सावे म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -