घररायगडवॉकेथॉनमधून पर्यावरण संवर्धनाचा संदेश डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महावीर जयंतीनिमित्त अलिबागमध्ये वॉकेथॉन

वॉकेथॉनमधून पर्यावरण संवर्धनाचा संदेश डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महावीर जयंतीनिमित्त अलिबागमध्ये वॉकेथॉन

Subscribe

महावीर चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून पुढे ग्रामपंचायत चेंढरे हद्दीतून बायपास रोड मार्गे नगरपालिका अलिबाग, सरखेल कान्होजी आंग्रे स्मारकास अभिवादन करून पुढे छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून वॉकेथॉन अलिबाग बीच येथे पोहचली.

रायगड जिल्हा परिषद, नगरपालिका अलिबाग व माणुसकी प्रतिष्ठान जीतनगर महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महावीर जयंती, माझी वसुंधरा जन जलजागृती अभियानअंतर्गत वॉकेथॉन २०२० चे आयोजन अलिबागमध्ये करण्यात आले होते.

गुरूवारी सकाळी ६ ते ८.३० वाजताच्या दरम्यान अलिबाग बीच येथून या वॉकेथॉनची सुरुवात झाली. यामध्ये झाडे लावा झाडे जगवा, झाडांचे संवर्धन करा, पाण्याचा वापर कमी करून पाणी वाचवणे, तसेच पावसाचे पाणी शक्य होईल तेवढे जमिनीत मुरवणे, प्लास्टिक मुक्ती आदी संदेश देत आणि प्लॅस्टिक कचरा गोळा करत ५ किलोमीटर वॉकेथॉन उत्साही वातावरणात संपन्न झाली. या वेळी रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, अलिबाग नगरपालिका मुख्यधिकारी अंगाई साळुंखे, उप मुख्य कार्यकारी अधिकरी (ग्राप)राजेंद्र भालेराव, समाजकल्याण अधिकरी गजानन लेंढी, पशुसंवर्धन अधिकारी कदम, पंचायत समिती अलिबाग गट विकास अधिकारी साळावकर, माणुसकी प्रतिष्ठान महाराष्ट्र अध्यक्ष डॉ.राजाराम हुलवान आदी मान्यवर उपस्थित होते.

- Advertisement -

महावीर चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून पुढे ग्रामपंचायत चेंढरे हद्दीतून बायपास रोड मार्गे नगरपालिका अलिबाग, सरखेल कान्होजी आंग्रे स्मारकास अभिवादन करून पुढे छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून वॉकेथॉन अलिबाग बीच येथे पोहचली. यावेळी माणुसकी प्रतिष्ठान महाराष्ट्र सचिव विशाल आढाव यांनी गारद बोलून छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष केला. यावेळी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, भगवान महावीर यांना अभिवादन करत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील म्हणाले की, पाणी व स्वच्छता ही जनजागृती चळवळ झाली पाहिजे. जीवनात स्वच्छतेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्यदायी सवयी सर्वांनी अंगिकारल्या पाहिजेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -