घरक्रीडाटीम इंडियाला धोनीचे मार्गदर्शन 

टीम इंडियाला धोनीचे मार्गदर्शन 

Subscribe

भारतीय संघात सर्वात अनुभवी खेळाडू आहे तो महेंद्रसिंग धोनी आणि तोच संघासाठी फ्रेंड आणि गाईड ठरत आहे. म्हणून चाहत्यांनी चिंता करायचे काही कारण नाही आहे.

नवी दिल्ली : इंग्लंड दौर्‍यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीने काही काळ विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शनिवारपासून सुरु झालेल्या आशिया चषकाच्या सामन्यात कोहलीचा करिष्मा आपल्याला दिसणार नाही आहे.

कोहली संघात नसल्यामुळे भारतीय संघ जिंकेल का अशी चिंता काही चाहत्यांनी व्यक्त केली होती. पण भारतीय चाहत्यांना घाबरण्याची आवश्यकता नाही. कारण भारतीय संघाबरोबर एक गाईड आणि स्टार खेळाडू आहे. भारताला इंग्लंडमध्ये एकदिवसीय मालिका आणि कसोटी मालिकेत भारताला 1-4 असा दारुण पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर विराटने विश्रांती घेण्याचे ठरवल्याने आशिया चषकासाठी संघाचे नेतृत्त्व रोहित शर्माकडे सोपवण्यात आले आहे.

- Advertisement -

भारतीय संघात सर्वात अनुभवी खेळाडू आहे तो महेंद्रसिंग धोनी आणि तोच संघासाठी फ्रेंड आणि गाईड ठरत आहे. म्हणून चाहत्यांनी चिंता करायचे काही कारण नाही आहे. धोनीला भारताचे कर्णधारपद सोडून 18 महिने पूर्ण झाले आहेत. पण संघावर अजूनही धोनीची पकड कायम आहे. कोहली अटीतटीचे क्षण आल्यावर दडपणाखाली येतो, त्यावेळी धोनीच संघाला गाईड करतो. त्यामुळे भारताला जर आशिया चषक जिंकायचा असेल तर त्यांना धोनीचे मार्गदर्शन मोलाचे ठरू शकते.

म्हणून इंग्लंड दौर्‍यात भारतीय संघ अपयशी – महेंद्रसिंग धोनी

इंग्लंड दौर्‍यावर असताना भारतीय संघाने सराव सामने कमी प्रमाणात खेळले, त्यामुळे भारतीय संघाच्या कसोटी मालिकेतील अपयशाला कमी झालेला सराव जबाबदार आहे. असे मत धोनीने व्यक्त केले आहे. कसोटी मालिकेआधी भारतीय संघाने अधिकाधिक सराव सामने खेळले पाहिजे होते. त्यामुळे फलंदाजांना इंग्लडच्या गोलंदाजांच्या चेंडूची गती, त्याच्या स्विंग याचा फारसा अंदाज येऊ शकला नाही. आणि फलंदाजी करणे कठीण होऊन बसले. पण हा खेळाचा भाग आहे. भारतीय संघ सध्या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे, ही गोष्ट आपण विसरून चालणार नाही, असेही त्याने नमूद केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -