घरक्रीडाइंग्लंडच्या मोईन अलीचा ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूवर गंभीर आरोप

इंग्लंडच्या मोईन अलीचा ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूवर गंभीर आरोप

Subscribe

लंडन : इंग्लडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अलीला ‘ओसामा’ अशी हाक मारून त्याचा  ऑस्ट्रेलियन खेळाडूने  अपमान केल्याचा आरोप त्याने केला आहे. त्याच्या या आरोपानंतर क्रिकेट जगात नव्या वादाला तोंड फुटले आहे.

2015 च्या झालेल्या अ‍ॅशेस मालिकेदरम्यान हा प्रकार घडला होता. कुख्यात आतंकवादी ‘ओसामा बिन लादेन’ असे संबोधल्यामुळे राग अनावर झाल्याचे मोईन अलीने सांगितले. कार्डिफ येथे झालेल्या पहील्या कसोटी सामन्यात मोईन अली ने 77 धावा आणि 5 बळी मिळवून अष्टपैलू कामगिरी केली.

- Advertisement -

या सामन्यात इंग्लडने ऑस्ट्रेलियाचा 169 धावांनी पराभव केला होता.31 वर्षीय मोईन अलीने आपल्या आत्मचरित्राचा काही भाग हा एका प्रसिद्ध नियतकालीकात प्रसिद्ध केला आहे.अ‍ॅशेस मालिकेत चांगली कामगिरी करुन देखील या टीकेमुळे विचलित झाल्याचे मोईने त्या लेखात म्हटले आहे. मोईन म्हणाला की माझी कामगिरी उत्तम होऊन सुद्धा मी आनंदी नव्हतो, झाल्या प्रकारामुळे मला अतिशय संताप आला होता.

मी माझ्या संघाला याची माहीती दिली होती. त्यांनी ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक डॅरेन लेहमन यांच्याकडे विचारपूस केली असता आपण असे बोललो नाही असे त्या खेळाडूने सांगितले. अलीने एका मुलाखती दरम्यान असे सांगितले की ऑस्ट्रेलिया हा एकमेव असा संघ आहे ज्यांनी मला अपमानास्पद अशी वागणूक दिली.

- Advertisement -

झालेल्या आरोपांची दखल घेत याबाबत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच इसीबी सोबत चर्चा झाल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या प्रवक्त्यांनी सांगितले. असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत असे त्यांनी पुढे बोलताना सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -