घरक्रीडाAsian Games 2023 : भारतीय पुरुष नेमबाजांचे 'सुवर्णलक्ष्य'; पदकावर नाव कोरताना रचला...

Asian Games 2023 : भारतीय पुरुष नेमबाजांचे ‘सुवर्णलक्ष्य’; पदकावर नाव कोरताना रचला विश्वविक्रम

Subscribe

Asian Games 2023 : आशियाई गेम्स 2023 मध्ये भारतीय खेळाडूंची उत्कृष्ट कामगिरी सुरूच आहे. भारत सध्या आशियाई गेम्सच्या क्रमवारीत चौथ्या क्रमाकावर आहे. नेमबाजी स्पर्धेत महिला संघानंतर आता पुरुष संघानेही आशियाई स्पर्धेत पदक पटकावले आहे. पुरुष संघाने भारतासाठी सुवर्णपदक जिंकताना विश्वविक्रमावर नाव कोरेल आहे. (Asian Games 2023 Golden Target for Indian Men Shooters A world record created while engraving the name on the medal)

ऐश्वर्या प्रताप सिंग तोमर, स्वप्नील कुसाळे आणि अखिल शेओरन यांच्या संघाने 50 मीटर रायफल 3 पोझिशनमध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकले आहे. यापूर्वी 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात पुरुष संघाच्या सरबज्योत सिंग, अर्जुन सिंग चीमा आणि शिवा नरवाल यांनी नेमबाजीत सुवर्णपदक पटकावले होते. महिला संघाने 10 मीटर एअर पिस्तूल सांघिक प्रकारातही रौप्यपदक पटकावले. भारताच्या ईशा, दिव्या आणि पलक यांनी हे पदक जिंकले होते.

- Advertisement -

हेही वाचा – Asian Games 2023 : गोळाफेक स्पर्धेत पदकांचा दुष्काळ संपला; किरण बालियानने पटकावले कांस्य

पलकने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक जिंकले. तर ईशा सिंगने रौप्य पदक जिंकले. पाकिस्तानच्या किश्माला तलतला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. पलकने 242.1 आणि ईशानने 239.7 गुण पटकावले. पलकने आशियाई क्रीडा स्पर्धेतही विक्रम केला. या स्पर्धेत तिने सर्वाधिक गुण पटकावले. तर, किश्मलाने 218.2 गुण मिळवले. ईशाचे हे स्पर्धेतील चौथे पदक आहे.

- Advertisement -

10 मीटर एअर पिस्तूल महिला सांघिक प्रकारात रौप्यपदक

10 मीटर एअर पिस्तूल महिला सांघिक स्पर्धेत भारताने रौप्य पदक जिंकले. भारतीय महिला संघाच्या खेळाडू ईशा सिंग, पलक आणि दिव्या यांनी आश्चर्यकारक कामगिरी केली. ईशा सिंग, पलक आणि दिव्या यांचा संघ 1731-50 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिला.

हेही वाचा – Asian Games 2023- पलकने ‘सुवर्ण’ तर ईशा सिंगने ‘रौप्य’पदक पटकावलं, भारताचं आठवं सुवर्णपदक

भारत आशियाई स्पर्धेत चौथ्या क्रमांकावर

आशियाई क्रीडा स्पर्धेचा आज (29 सप्टेंबर) सहावा दिवस आहे. भारताला सहाव्या दिवशी नेमबाजीत पाच पदके मिळाली आहेत. टेनिसमध्ये एक रौप्य आणि शॉटपुट व स्क्वॅशमध्ये प्रत्येकी एक कांस्यपदक मिळाले आहे. यासह एकूण पदकांची संख्या आता 33 झाली आहे. यापूर्वी, खेळांच्या पाचव्या दिवसापर्यंत भारत 6 सुवर्ण, 8 रौप्य आणि 11 कांस्यपदकांसह पाचव्या स्थानावर होता. आता भारत 8 सुवर्ण, 12 रौप्य आणि 13 कांस्यपदक चौथ्या स्थानावर आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -