घरनवी मुंबईरायगड जिल्ह्यात समुपदेशनामुळे १०८ जणांचे वाचले प्राण

रायगड जिल्ह्यात समुपदेशनामुळे १०८ जणांचे वाचले प्राण

Subscribe
अलिबाग:  मानसिक आजारावर अंकुश ठेवण्यासाठी अलिबागमधील जिल्हा सामान्य रुग्णालयाने पुढाकार घेतला आहे. मानसिक आजार मुक्तीसाठी फलकांद्वारे जनजागृती व व्याख्यानांचे आयोजन केले आहे. रायगड जिल्ह्यामध्ये सप्टेंबर २०२२ ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत १०८ जणांचे प्राण वाचविण्यात यश आले आहे.
जागतिक आत्महत्या प्रतिबंध सप्ताहानिमित्त हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. मोबाईलच्या जगतामध्ये नागरिक एकमेकांपासून जवळ आला असता, तरीही संवाद कमी झाले आहे. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे व्यक्त होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. नैराश्यापोटी आत्महत्या करण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. रायगड जिल्ह्यामध्ये सप्टेंबर २०२२ ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत १०८ जणांनी नैराश्यामुळे आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, जिल्हा रुग्णालयातील मानसोपचार तज्ञांमार्फत योग्य उपचार आणि समुपदेशन करण्यात आले. त्यामुळे १०८ जणांचे प्राण वाचवण्यास त्यांना यश आले. त्यात ४९ पुरुष व ५९ महिलांचा समावेश आहे.
आत्महत्या रोखण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या माध्यमातून जनजागृतीपर कार्यक्रम सुरू करण्यात आले आहे. १० ते १६ सप्टेंबर या कालावधीत आत्महत्या प्रतिबंध सप्ताह सुरू केला होता. सप्ताहाच्या निमित्ताने जिल्ह्यात जागृतीपर कार्यक्रम केले होते, आत्महत्या न करण्याचा संदेश वेगवेगळ्या फलकांमार्फत पोहचवण्याचा प्रयत्न केला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील परिचारिकांद्वारे हा संदेश गावागावांत पोहचवण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे.
वाढत्या मानसिक आजारावर अंकुश ठेवण्यासाठी अलिबागमधील जिल्हा सामान्य रुग्णालयाने पुढाकार घेतला आहे. मानसिक आजार मुक्तीसाठी फलकांद्वारे जनजागृती व व्याख्यानांचे आयोजन केले आहे. जागतिक आत्महत्या प्रतिबंध सप्ताहानिमित्त हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.मोबाईलच्या जगतामध्ये नागरिक एकमेकांपासून जवळ आला असला, तरीही संवाद कमी झाले आहे. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे व्यक्त होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. नैराश्यापोटी आत्महत्या करण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत.
… तर मानसिक आजार होतो
मानसिक आजार म्हणजे आपल्या विचार, भावना आणि वर्तन यातला ताळमेळ बिघडणे/ बदल होणे, आणि त्यामुळे दैनंदिन आयुष्यामध्ये अडथळे येणे. यामध्ये समाजिकीकरणावर सुद्धा परिणाम होतो, कामाच्या ठिकाणी किंवा कुटुंबियांसमवेत राहताना सुद्धा अडचणी येत असतात.काही ना काही कारणांनी अस्वस्थता येते. मग तो राग असो, दुःख, अपराधीपणा, चिंता, निराशा, अश्या नकारार्थी भावनांमुळे. हि अस्वस्थता. थोडा काळ असेल तर ठीक, आपण त्यातून बाहेर येतो. किंवा कॉउंसेल्लोर ची मदत घेतो. पण हि अस्वस्थता सतत, जास्त काळ, वरचेवर येत राहिली आणि साधारण ६ महिन्यांपेक्षा जास्त काळ येत राहिली तर तो मानसिक आजार होतो. ६ महिन्यांपर्यंत तो मानसिक कॉन्सर्न असतो.
 १४४१६ नंबर ठरतोय वरदान
मानसिक आरोग्यसंबंधित मोफत मार्गदर्शन करण्यासाठी १४४१६ हा टोल फ्री क्रमांक सुरू केला आहे. मानसिक आजाराच्या आहारी जाणाऱ्यांना या क्रमांकामार्फत मार्गदर्शन करून त्यांची आत्महत्या रोखण्याचा प्रयत्न आहे. जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात ६० जणांचे समुपदेशन करून मानसिक संतुलन स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे हा क्रमांक मानसिक रुग्णांसाठी वरदान ठरत आहे.
बदलत्या राहणीमानामुळे मनमोकळेपणाने संवाद थांबले आहे. त्यामुळे मानसिक तणावातून आत्महत्येच्या प्रमाणात वाढ झाली आहे. नैराश्य हा मानसिक आजार आहे. मनाने खचून न आता प्रत्येकाने संवाद साधला पाहिजे.आजार झाला तर मानसिक डॉक्टरचा सल्ला घ्यावा. कॉन्सर्न असेल तर कोणसेल्लिंगने यावर उपाय करता येतो. डिप्रेशन करता मात्र हा काळ १५ दिवसांचा आहे. अस्वस्थता येण्याची खूप कारणे आहेत. नकारार्थी भावनांवर कंट्रोल असणे हे महत्वाचे आहे..
 – डॉ. अर्चना सिंह, मानसोपचार तज्ञ
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -