घरक्रीडाAsian Games 2023: भारतानं रचला इतिहास; गुणतालिकेत भारत चौथ्या क्रमांकावर

Asian Games 2023: भारतानं रचला इतिहास; गुणतालिकेत भारत चौथ्या क्रमांकावर

Subscribe

या स्पर्धेत भारतीय संघाने मागील सर्वोत्तम कामगिरीला मागे टाकले आहे. आतापर्यंत भारतानं 81 पदकं जिंकली आहेत. आता भारतासमोर 100 हून अधिक पदके जिंकण्याचे लक्ष्य गाठण्याचे आव्हान आहे. महिला नेमबाजी संघाने 24 सप्टेंबर रोजी हांगझोऊ येथे भारतासाठी पदकाचे खाते उघडले होते.

भारतीय खेळाडूंची आशियाई क्रीडा स्पर्धेत दमदार कामगिरी सुरू आहे. भारताने 24 सप्टेंबर रोजी पहिले पदक जिंकले आणि तेव्हापासून विजयाचा सिलसिला कायम आहे. 2018 च्या आशियाई खेळांमध्ये, भारतीय संघाने 570 सदस्यांच्या मजबूत तुकडीतून 70 पदके मिळवून आशियाई खेळांमध्ये सर्वाधिक पदकांचा विक्रम प्रस्थापित केला होता. आता या स्पर्धेत भारतीय संघाने मागील सर्वोत्तम कामगिरीला मागे टाकले आहे. आतापर्यंत भारतानं 81 पदकं जिंकली आहेत. आता भारतासमोर 100 हून अधिक पदके जिंकण्याचे लक्ष्य गाठण्याचे आव्हान आहे. महिला नेमबाजी संघाने 24 सप्टेंबर रोजी हांगझोऊ येथे भारतासाठी पदकाचे खाते उघडले होते. (Asian Games 2023 India makes history India ranks fourth in the points table)

आजच्या दिवसात तीन सुवर्णपदकांची कमाई

आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारतानं 3 सुवर्ण पदाकांव्यतिरिक्त 5 रौप्य पदकं आणि 4 कांस्य पदकं जिंकली. त्यामुळे भारताच्या पदकांची संख्या 81 झाली आहे. 18 सुवर्ण पदकांव्यतिरिक्त भारतानं 31 रौप्य पदकं आणि 32 कांस्य पदकं जिंकली आहेत. मात्र, पदकतालिकेत भारत चौथ्या स्थानावर कायम आहे. चीन 167 सुवर्ण पदकांसह एकूण 310 पदकांसह अव्वल स्थानावर आहे. तर जपान 37 सुवर्णपदकांसह 147 पदकं जिंकत दुसऱ्या स्थानी आहे.

- Advertisement -

नीरज चोप्रा आणि किशोर जेना यांनी मिळून भालाफेकमध्ये इतिहास रचला आहे. नीरजने सुवर्णपदक तर किशोरने रौप्यपदक पटकावले आहे. नीरजचा सर्वोत्तम थ्रो 88.88 मीटर आणि किशोरचा 87.54 मीटर होता. याच जोरावर त्यांनी पदकं जिंकली. आशियाई क्रीडा स्पर्धेत भालाफेकीत भारताने एकाच वेळी दोन्ही पदके जिंकण्याची इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे.

(हेही वाचा: Asian Games : शेवटी चायनीज तंत्रज्ञानच…; नीरजने फेकलेला भालाही मोजता आला नाही )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -