घरक्रीडाIND vs AUS : ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत भारताला व्हाईटवॉश देणार - वॉ  

IND vs AUS : ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत भारताला व्हाईटवॉश देणार – वॉ  

Subscribe

भारतीय संघ या मालिकेत पुनरागमन करू शकेल असे मार्क वॉला वाटत नाही.

भारतीय संघाने अ‍ॅडलेड येथे झालेला पहिला कसोटी सामना ज्याप्रकारे गमावला ते पाहता, चार सामन्यांच्या या मालिकेत ते एकही सामना जिंकणार नाहीत, याची ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मार्क वॉला खात्री आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या कसोटी सामन्यात भारताला ८ विकेट राखून पराभूत केले होते. भारताने पहिल्या डावात आघाडी घेतली, पण त्यांचा दुसरा डाव अवघ्या ३६ धावांत आटोपला. त्यामुळे भारताला पराभवाला सामोरे जावे लागले. आता भारतीय संघ या मालिकेत पुनरागमन करू शकेल, असे मार्क वॉला वाटत नाही.

भारतीय संघ या मालिकेत पुनरागमन करेल असे मला वाटत नाही. भारतीय संघ अ‍ॅडलेड येथे झालेली पहिली कसोटी जिंकेल असे मला वाटले होते. विराट कोहली त्या सामन्यात खेळला आणि अ‍ॅडलेड येथील परिस्थिती भारताला अनुकूल होती. मात्र, या गोष्टींचा त्यांना फायदा घेता आला नाही. ते उर्वरित तीनपैकी एकही सामना जिंकतील असे मला वाटत नाही. ऑस्ट्रेलियन संघ भारताला व्हाईटवॉश देईल. ऑस्ट्रेलियन संघ चार सामन्यांची ही मालिका ४-० अशी जिंकेल, असे मार्क वॉ म्हणाला.

- Advertisement -

मार्क वॉच्या आधी ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक ब्रॅड हॅडीननेही भारतीय संघाला आता ही मालिका जिंकण्याची संधी नसल्याचे म्हटले होते. भारताला या मालिकेत सामना जिंकण्याची केवळ एकच संधी होती, ती म्हणजे अ‍ॅडलेड येथे झालेल्या पहिल्या कसोटीत. मात्र, भारताने ही संधी गमावली. अ‍ॅडलेड येथील खेळपट्टी आणि वातावरण भारतीय संघाला अनुकूल होते. मात्र, त्यांनी पुरेशा धावा केल्या नाहीत. आता पुढील सामन्यांत ते पुनरागमन करू शकतील असे मला वाटत नाही, असे हॅडीन म्हणाला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -