घरक्रीडातिसऱ्या टेस्टसाठी अश्विन आणि बुमराह फिट

तिसऱ्या टेस्टसाठी अश्विन आणि बुमराह फिट

Subscribe

भारतीय टीममधील जलद बॉलर जसप्रीत बुमराहला फिट असल्याचं घोषित करण्यात आलं आहे. त्यामुळं तिसऱ्या कसोटीमध्ये जसप्रीत खेळण्याची शक्यता आहे.

इंग्लंडमध्ये दोन टेस्ट मॅच हरल्यानंतर आता भारतीय क्रिकेट टीमसाठी एक खुशखबर आहे असंच म्हणावं लागेल. भारतीय टीममधील जलद बॉलर जसप्रीत बुमराहला फिट असल्याचं घोषित करण्यात आलं आहे. इंग्लंडविरुद्ध नॉटिंगहॅममध्ये सुरु होणाऱ्या तिसऱ्या टेस्टमध्ये जसप्रीत खेळू शकणार आहे. सध्या इंग्लंड पाच टेस्टच्या सामन्यांमध्ये २-० नं आघाडीवर आहे. जूनमध्ये डबलिनमध्ये आयर्लंडच्या विरुद्ध खेळत असता बुमराहच्या डाव्या हाताला लागलं होतं. अंगठ्यामध्ये फ्रॅक्चर असल्यामुळं पुढील मॅचमध्ये बुमराह खेळू शकला नाही. मात्र आता बुमराह पूर्ण तऱ्हेनं फीट असून तिसऱ्या मॅचमध्ये खेळू शकणार आहे. बुमराहचं प्लास्टर काढण्याची वाट पाहण्यात येत होती असं म्हटलं जात आहे. नेट सरावात बुमराहला पाहण्यात आलं आहे, त्यामुळं तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये बुमराह खेळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र आता अंतिम अकरामध्ये बुमराहला जागा देण्यात येते का? हे लवकरच कळेल.

अश्विनही फीट

दरम्यान, रविचंद्रन अश्विन आणि हार्दिक पंड्यादेखील फीट असल्याचं घोषित करण्यात आलं आहे. दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये दुसऱ्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना दोघांच्याही हाताच्या बोटांना दुखापत झाली होती. अश्विनबरोबर असं दोन वेळा घडलं आहे. मात्र आता हे दोघेही फीट असल्याचं सांगण्यात आलं आहे. तर कॅप्टन विराट कोहलीदेखील तिसऱ्या मॅचसाठी पूर्णपणे फीट आहे. पूर्ण भारतीय टीमनं जिमच्या सरावामध्ये भाग घेतला होता. त्यामुळे आता अंतिम अकरामध्ये नक्की कोणाचा समावेश करण्यात येईल आणि जसप्रीत बुमराहचा समावेश करून तिसरी कसोटी जिंकण्यासाठी भारताचा प्रयत्न असेल असे सध्या चित्र आहे. दरम्यान नक्की काय निर्णय घेण्यात येईल हे तिसऱ्या कसोटीपूर्वी कळेलच.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -