घरदेश-विदेशकेरळमध्ये पूरस्थिती; कोची विमानतळ शनिवारपर्यंत बंद!!

केरळमध्ये पूरस्थिती; कोची विमानतळ शनिवारपर्यंत बंद!!

Subscribe

मुसळधार पावसामुळे केरळमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कोचीविमानतळ शनिवारपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

केरळमध्ये पावसाने हाहा:कार माजला आहे. मुसळधार पावासाने केरळातील जनजीवन विस्कळीत झाले असून राज्यामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. १४ पैकी १२ राज्यांमध्ये रेड अर्लट जारी करण्यात आला आहे. विशेष म्हणजे पावसामुळे कोची विमानतळ शनिवारपर्यंत बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे शनिवारपर्यंत कोची विमानतळावरून विमानाचे एकही उड्डाण होणार नाही. जोरदार पावसामुळे धरणे देखील फुल्ल झाली असून ३० पेक्षा जास्त धरणांचे दरवाजे उघडण्यात आले आहे. परिणामी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ५२ जणांना आपला जीव गमवावा लागला असून हजारोंच्या संख्येनं लोक अन्न आणि पाण्याशिवाय जगत आहेत. नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. यामध्ये केवळ एरनाकुलममधील २३ हजार लोकांचा समावेश आहे. राज्यातील भयंकर स्थिती पाहता मुख्यमंत्री पी. विजयन यांनी देखील चिंता व्यक्त केली असून आम्ही अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना करत असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, प्रशासन नागरिकांना सर्वतोपरी मदत करत आहे. बागायती शेतीला देखील पावसाचा फटका बसला आहे. केळी, नारळीच्या बागा उद्धवस्त झाल्याचे चित्र सर्वत्र पाहायाला मिळत आहे. एनडीआरएफ आणि लष्कराच्या मदतीने मदत कार्य सुरू आहे.

वाचा – केरळमध्ये पावसाचे ३९ बळी; केंद्राकडून १०० कोटी मदतीची घोषणा

कोची विमानतळ बंद

आसपासच्या भागामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शनिवारपर्यंत कोची विमानतळ बंद करण्यात आला आहे. रन वेवर देखील पाणीच पाणी असे चित्र सर्वत्र आहे. शनिवारी दुपारी २ पर्यंत परिस्थिती पाहून पुढील निर्णय घेऊ असे कोची विमानतळ प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, कोची विमानतळावरील विमाने तिरूअनंतपुरम आणि कोझीकोडे विमानतळाकडे वळवण्यात आली आहेत. राज्यातील ३३ धरणे फुल्ल झाली असून कोची विमानतळ हे पेरियार नदीच्या काठी आहे. त्यामुळे नदीला आलेली पूरस्थिती पाहता खबरदारीचा उपाय म्हणून कोची विमानतळ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केरळमधील प्रमुख धरणांपैकी इदामयार, इडुक्की आणि मुल्लापेरियार या धरणांचे दरवाजे देखील उघडण्यात आले आहेत. राज्यातील ३३ धरणांचे दरवाजे उघडण्यात आल्याने अनेक नद्यांना पूर आला आहे.

- Advertisement -

रेल्वे सेवेवर देखील परिणाम

मुसळधार पावसामुळे रेल्वे सेवा देखील विस्कळीत झाली आहे. कन्याकुमारी ते तिरूअनंतपुरम दरम्यान धावणाऱ्या रेल्वे ३० किमीप्रति तास वेगाने धावत आहेत. केरळ सरकारने लष्कराकडे आणखीन मदतीची मागणी केली आहे. सध्या एनडीआरएफ देखील घटनास्थळी मदतकार्य करत आहे. आत्तापर्यंत अनेक जणांना वाचवण्यात आले आहे. राज्यसरकारने पर्यंटकांना देखील डोंगराळ भागात जाणे टाळा असे बजावले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये भूसख्खलन झाले असून बचावकार्य सुरू आहे. हवामान विभागाने देखील वयांद, कोझीकोडे, कन्नूर, मल्लापूरम, पलाकड, इडुक्की आणि कोझीकोडे जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट जारी केला आहे.

अतिरिक्त पाणी घेण्यास तामिळनाडूचा नकार

तामिळनाडू आणि केरळ इडुक्की आणि मुल्लापेरियार या धरणांचे पाणी वाटून घेतात. पण, आता मात्र तामिळनाडूने अतिरिक्त पाणी घेण्यास नकार दिला आहे. धरणांमधून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे नद्यांना पूर आला आहे. तर नद्यांची पाणी पातळी ही १४२ फूट इतकी गेली आहे. यावर केरळाचे मुख्यमंत्री तामिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांच्याशी चर्चा करणार आहेत.

वाचा – केरळमध्ये पावसाचे २९ बळी
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -