घरक्रीडाबुमराह, धवनचे पुनरागमन

बुमराह, धवनचे पुनरागमन

Subscribe

श्रीलंका टी-२०, ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर

वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि सलामीवीर शिखर धवनचे जानेवारीत होणार्‍या श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. उपकर्णधार रोहित शर्माला श्रीलंकेविरुद्ध विश्रांती देण्यात आली आहे. तसेच दीपक चहर या दोन्ही मालिकांत खेळू शकणार नाही. त्याला पुढील वर्षीच्या आयपीएलपर्यंत मैदानाबाहेर रहावे लागू शकेल.

सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाज म्हणून ओळखल्या जाणार्‍या बुमराहला मागील काही महिने पाठीच्या दुखापतीमुळे मैदानाबाहेर रहावे लागले होते. मात्र, त्याने काही दिवसांपूर्वीच भारतीय संघासोबत सराव केला होता. आता त्याला भारतीय संघाचे फिजिओ नितीन पटेल यांनी गुजरातच्या रणजी करंडकातील पुढील सामन्यात खेळण्याचीही परवानगी दिली आहे.

- Advertisement -

श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकांसाठी जसप्रीत बुमराहचे संघात पुनरागमन झाले आहे. श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी आम्ही रोहित आणि शमीला विश्रांती दिली आहे. शिखर धवनही संघात परतला असून टी-२० मालिकेत संजू सॅमसन राखीव सलामीवीर असेल, अशी माहिती बीसीसीआयच्या निवड समितीचे अध्यक्ष एम.एस.के प्रसाद यांनी दिली. भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेला ५ जानेवारीपासून सुरुवात होईल. त्यानंतर १४ जानेवारीपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरु होईल.

भारतीय संघ –

श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (यष्टीरक्षक), शिवम दुबे, रविंद्र जाडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मनीष पांडे, शार्दूल ठाकूर, नवदीप सैनी, वॉशिंग्टन सुंदर, संजू सॅमसन.

- Advertisement -

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (यष्टीरक्षक), मनीष पांडे, शिवम दुबे, केदार जाधव, रविंद्र जाडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, शार्दूल ठाकूर.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -