घरक्रीडाIPL मधून बाहेर असलेला पुजारा इंग्लंडमध्ये तळपला, काउंटीमध्ये ठोकलं द्वीशतक

IPL मधून बाहेर असलेला पुजारा इंग्लंडमध्ये तळपला, काउंटीमध्ये ठोकलं द्वीशतक

Subscribe

इंडियन प्रीमियर लीगमधून (IPL) बाहेर असलेला भारताचा प्रमुख कसोटीपटू चेतेश्वर पुजारा इंग्लंडमध्ये चमकदार कामगिरी करतोय. पुजाराने इंग्लंडच्या काउंटी चॅम्पियनशिपमध्ये मोसमातील पहिले द्विशतक झळकावले. भारतीय कसोटी संघातून बाहेर असलेला चेतेश्वर पुजारा संघात पुनरागमन करण्यासाठी फॉर्मच्या शोधात आहे.

काउंटी चॅम्पियनशिपमध्ये ससेक्स संघासोबत पदार्पण सामना खेळत असलेल्या पुजाराने धमाकेदार सुरुवात केली. पहिल्या सामन्याच्या पहिल्या डावात तो स्वस्तात बाद झाला, पण त्यानंतर संघाला त्याची गरज असताना त्याने दमदार नाबाद द्विशतक झळकावून सामना वाचवला. त्याच्या जुन्या काउटी संघ डर्बीशायरविरुद्ध खेळताना त्याने सामन्यात एकूण २०७ धावा केल्या. पहिल्या डावात डर्बीशायरने ८ बाद ५०५ धावांवर डाव घोषित केला. प्रत्युत्तरात, ससेक्सचा पहिला डाव अवघ्या १७४ धावांत आटोपला, त्यामुळे फॉलोऑन खेळावा लागला, यानंतर संघाने जोरदार पुनरागमन केले आणि ३ गडी गमावून ५१३ धावा केल्या, त्यामुळे सामना अनिर्णित घोषित करण्यात आला.

- Advertisement -

पुजाराच्या द्विशतकामुळे दिलासा

फॉर्मच्या शोधात इंग्लंडच्या भूमीवर उतरलेल्या पुजाराने पहिल्याच सामन्यात द्विशतक झळकावल्याने चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. त्याच्या खराब कामगिरीमुळे त्याला कसोटी संघातून वगळल्यानंतर निवड समितीने त्याला देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावा करून पुनरागमन करण्याचा सल्ला दिला होता. पुजाराने दुसऱ्या डावात ३८७ चेंडूंचा सामना करत २३ चौकार लगावले आणि २०१ धावांवर नाबाद परतला. रणजी ट्रॉफीमध्येही त्याच्या बॅटमधून धावा झाल्या होत्या. पुजाराने मुंबईविरुद्ध अहमदाबादमध्ये दुसऱ्या डावात ९१ धावा केल्या होत्या तर गोव्याविरुद्ध दुसऱ्या डावात नाबाद ६४ धावा केल्या होत्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -