घरताज्या घडामोडीकॉंग्रेस काळातच दंगलींनी देशात नरसंहार, जेपी नड्डांचे देशवासीयांना खुले पत्र

कॉंग्रेस काळातच दंगलींनी देशात नरसंहार, जेपी नड्डांचे देशवासीयांना खुले पत्र

Subscribe

देशातील प्रमुख विरोधी पक्षांनी संयुक्त निवेदन जारी करत देशातील जातीय हिंसाचाराच्या घटनांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का आहेत ? असा प्रश्न एका निवेदनाच्या माध्यमातून केला आहे. रामनवमी आणि हनुमान जयंतीच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या शोभायात्रा आणि झालेल्या हिंसाचाराच्या निमित्ताने हे निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनाला उत्तर देतानाच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी प्रत्युत्तर दिले आहे. देशातील जनतेला आवाहन करत एक खुले पत्र त्यांनी शेअर केले आहे. कॉंग्रेस काळातील दंगलींची यादी देत त्यांनी देशातील तरूणांना विनाश नव्हे तर विकास हवा आहे अशा शब्दात उत्तर दिले आहे.

विरोधकांनी आतापर्यंत भेदभाव आणि व्होट बॅंकेचे राजकारण केल्याचा आरोप केला आहे. विरोधकांनी आता विकासाचे राजकारण करावे असा सल्ला दिला आहे. कॉंग्रेसने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना संसदीय निवडणुकीत पराभूत केले होते, याचीही आठवणही जेपी नड्डा यांनी देशवासीयांना लिहिलेल्या पत्रात करून दिली. कॉंग्रेसच्या काळातच देशात नरसंहार झाले. या दंगलीची यादीत त्यांनी दिली. देशाच्या स्वातंत्र्याला २०४७ मध्ये शंभर होतील तेव्हा भारत देशवासीयांना कसा हवा आहे, असा सवालही नड्डा यांनी केला. देशातील गरिबी हटवणे आणि भारताने नवीन यशोशिखर गाठण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे नड्डा यांनी नमुद केले.

- Advertisement -

देशातील १३ नेत्यांचे संयुक्त निवेदन

देशातील विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी संयुक्त निवेदन जारी करत देशातील परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. त्यामध्ये कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शरद पवार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल कॉंग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन, माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूख अब्दुल्ला, बिहारचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव, भाकपचे सरचिटणीस डी राजा, देबब्रत बिस्वास, मनोज भट्टाचार्य, दीपांकर भट्टाचार्य, पी के कुन्हालीकुट्टी या १३ नेत्यांनी हे निवेदन सादर केले आहे.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -