घरक्रीडाIPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये DC चा KXIP वर उत्कंठावर्धक विजय!

IPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये DC चा KXIP वर उत्कंठावर्धक विजय!

Subscribe

दुबईमध्ये सुरू झालेल्या यंदाच्या IPL 2020 मध्ये आज स्पर्धेचा दुसराच सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. DC अर्थात Delhi Capitals आणि KXIP अर्थात Kings XI Punjab यांच्यात प्रचंड उत्कंठावर्धक ठरलेल्या या मॅचमध्ये अखेर दिल्ली कॅपिटल्सने किंग्ज इलेव्हन पंजाबवर विजय मिळवत आपल्या खात्यात गुणांची कमाई केली आहे. पहिल्या इनिंगमध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या मार्कस स्टॉयनिसनं केलेले ५३ रन्स आणि दुसऱ्या इनिंगमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबचा मधल्या फळीचा बॅट्समन मयांक अग्रवालनं केलेली धावांची खेळी या मॅचचं प्रमुख आकर्षण ठरलं. मयांकची हीच खेळी किंग्ज इलेव्हनला विजयापर्यंत घेऊन गेली. मात्र, विजयाला १ रन शिल्लक असताना मयांक अग्रवाल स्टॉयनिसच्या बॉलिंगवर हॅटमायरकडे कॅच देऊन आऊट झाला. त्यामुळे शेवटच्या एका बॉलवर एक रन आवश्यक असताना किंग्जचा बॅट्समन जॉर्डन आऊट झाला आणि मॅच सुपर ओव्हरमध्ये गेली. अवघ्या ३ बॉलची असलेल्या सुपर ओव्हरमध्ये किंग्ज इलेव्हनला फक्त २ रन करता आले. त्यात किंग्जच्या २ विकेट देखील गेल्या.

विजयासाठी अवघ्या ३ रन्सचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या दिल्ली कॅपिटल्सच्या बॅट्समन्सला जिंकण्यासाठी फार कष्ट करावेच लागले नाहीत. मोहम्मद शमीने दुसराच बॉल पृथ्वी शॉला वाईड टाकून एक रन बहाल केला. आणि उरलेले दोन रन पृथ्वी शॉनं फ्लिक मारून काढले.

- Advertisement -

त्याआधी दिल्ली कॅपिटल्सनं २० ओव्हर्समध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबसमोर विजयासाठी १५८ रन्सचं आव्हान ठेवलं होतं. दिल्लीच्या संपूर्ण इनिंगमध्ये सगळ्या आकर्षक ठरली मार्कस स्टॉयनिसनं केलेली २१ बॉलमध्ये ५३ रन्सची खेळी. स्टॉयनिसनं अखेरच्या दोन षटकांमध्ये केलेल्या धुवाँधार फटकेबाजीच्या जोरावर दिल्लीला किंग्जसमोर १५८ रन्सचं टार्गेट ठेवलं. पृथ्वी शॉ आणि शिखर धवन ही सलामीची जोडी अवघ्या ९ रन्स स्कोअरबोर्डवर असताना माघारी परतल्यानंतर आलेल्या रिषभ पंत आणि श्रेयस अय्यर यांनी ७३ रन्सची भागीदारी केली आणि दिल्लीला मजबूत स्थितीत आणून ठेवलं. रिषभ पंत ३१ (२९) रन्सवर आऊट झाल्यानंतर पाठोपाठ श्रेयस अय्यर देखील पुढच्याच ओव्हरमध्ये मोहम्मद शमीच्या बॉलिंगवर जॉर्डनच्या हातात कॅच देऊन आऊट झाला. त्यानंतर स्टॉयनिसनं मधल्या फळीतल्या बॅट्समन्सला सोबत घेऊन मोठी धावसंख्या उभारली.

दिल्ली कॅपिटल्सने ठेवलेल्या आव्हानाचा सामना करताना किंग्जचा कॅप्टन के एल राहुल आणि मयांक अग्रवाल यांनी सावध सुरुवात केली. मात्र, पाचव्या ओव्हरमध्ये टीमचे ३० रन्स स्कोअरबोर्डवर लागलेले असताना के एल राहुल आऊट झाला. त्यानंतर आलेला करूण नायर सहाव्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर आऊट झाला. त्याच ओव्हरमध्ये निकोलस पूरन देखील खातंही न उघडता माघारी परतला. आर. अश्विनच्या या ओव्हरमध्ये दिल्लीला २ विकेट्स तर मिळाल्या, पण अश्विन सेलिब्रेट करताना जखमी झाला आणि पव्हेलियनमध्ये परतला. त्यापाठोपाठ सातव्या ओव्हरमध्ये रबाडाने ग्लेन मॅक्सवेलला एवघ्या एक रनवर आऊट केलं. त्यानंतर आलेल्या सर्फराजलाही (२०) अक्षर पटेलनं स्वस्तात माघारी धाडलं. सहाव्या क्रमांकावर आलेल्या क्रष्णप्पा गौतमला सोबत घेऊन मयांक अग्रवालनं डाव उभा करायला सुरुवात केली आणि डावाला शेवटपर्यंत घेऊन गेला.

- Advertisement -

दरम्यान, बॉलिंग करताना आपल्या पहिल्याच ओव्हरमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबच्या २ विकेट्स घेणारा लेग स्पिनर रविचंद्रन अश्विन जखमी झाल्यामुळे पुढच्या पूर्ण इनिंगमध्ये त्याला बॉलिंग करता आली नाही. त्याची दुखापत दिल्ली कॅपिटल्सच्या दृष्टीने चिंतेचा विषय ठरू शकते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -