घरक्रीडाधोनीची कर्णधारपद सोडण्याची धमकी! वाइड बॉल फेकणे थांबवा नाहीतर...

धोनीची कर्णधारपद सोडण्याची धमकी! वाइड बॉल फेकणे थांबवा नाहीतर…

Subscribe

नवी दिल्ली : आयपीएल 2023 च्या अटीतटीच्या झालेल्या सहाव्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने लखनऊ सुपरजायंट्सचा 12 धावांनी पराभव केला. 217 धावा करूनही लखनऊ संघाने 205 धावा केल्या. या धावा करण्यासाठी त्यांना चेन्नईच्या गोलंदाजांनी मदत केली. चेन्नईच्या गोलंदाजांनी 13 वाइड आणि तीन नो बॉल फेकले. गोलंदाजांनी अतिरिक्त धावा दिल्यामुळे संतापलेल्या धोनीने सामना संपल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधारपद सोडण्याचा इशारा दिला आहे. इम्पॅक्ट प्लेअर म्हणून चेन्नईने तुषार देशपांडेला संधी; मात्र त्याने 3 नो बॉल टाकले.

धोनी म्हणाला की, हा एक उत्कृष्ट आणि मोठ्या धावसंख्येचा सामना होता. विकेट कशी असेल असा प्रश्न आम्हा सगळ्यांना पडला होता, कारण 4 वर्षांनंतर या मैदानावर हा पहिलाच सामना होता. त्यामुळे मला वाटले की खेळपट्टी खूप संथ असेल, पण या खेळपट्टीवर धावा करणे सोपे गेले. या सामन्यानंतर अशा प्रकारची विकेट पुन्हा तयार करू शकतो का हे पाहावे लागेल.

- Advertisement -

वेगवान गोलंदाजीत आम्हाला थोडी सुधारणा करावी लागेल. आमच्या वेगवान गोलंदाजांना परिस्थितीनुसार गोलंदाजी करणे आवश्यक आहे. महत्त्वाचे म्हणजे विरोधी गोलंदाज काय करत आहेत यावर नजर ठेवली तर आमचे वेगवान गोलंदाज काय करू नये हे शिकू शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना नो बॉल किंवा एक्स्ट्रा वाइड्स टाकू नये नाहीतर त्यांना नवीन कर्णधाराच्या आत खेळावे लागेल. हा माझा दुसरा इशारा असेल आणि त्यानंतर मी कर्णधारपद सोडेन. आम्ही धावा केल्या याचे एकमेव कारण म्हणजे पीच चांगली होती.

चेन्नईच्या वेगवान गोलंदाजांची खराब कामगिरी
लखनऊविरुद्धच्या सामन्यात चेन्नईचे वेगवान गोलंदाज चांगलेच महागात पडले. दीपक चहरने चार षटकात पाच वाईड्ससह ५५ धावा दिल्या आणि त्याला एकही विकेट मिळाली नाही. त्याचवेळी तुषार देशपांडेला चेन्नईने इम्पॅट प्लेअर म्हणून संधी दिली आणि त्याने 2 विकेट घेतल्या असल्या तरी चार षटकांत त्याने चार वाइड आणि तीन नो बॉल टाकताना 45 धावा दिल्या. बेन स्टोक्सने एका षटकात 18 धावा दिल्या, तर हंगरगेकरने 2 षटकात 24 धावा दिल्या. वेगवान गोलंदाजांना सपशेल अपयशी ठरले असले फिरकी गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. मोईन अलीने चार षटकांत २६ धावा देत सर्वाधिक 4 विकेट घेतल्या, तर सँटनरने 4 षटकांत २१ धावा देत एक विकेट घेतली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -