घरक्रीडाIPL 2020 : इंग्लंड, ऑस्ट्रेलियाचे खेळाडू राहणार ३६ तास क्वारंटाईनमध्ये 

IPL 2020 : इंग्लंड, ऑस्ट्रेलियाचे खेळाडू राहणार ३६ तास क्वारंटाईनमध्ये 

Subscribe

दोन्ही देशांचे खेळाडू पहिल्या सामन्यापासून आयपीएल खेळू शकणार आहेत.  

आयपीएलच्या यंदाच्या मोसमाच्या येत्या शनिवारपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या आठही फ्रेंचायझीचे खेळाडू गेल्या काही दिवसांपासून जोरदार सराव करत आहेत. मात्र, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या देशांचे प्रमुख खेळाडू अजून युएई दाखल झालेले नाही. या दोन संघांमध्ये मर्यादित षटकांची मालिका सुरु होती, ज्याचा अखेरचा एकदिवसीय सामना बुधवारी पार पडला. त्यामुळे आता या दोन्ही संघांचे खेळाडू लवकरच युएईमध्ये प्रवेश करणार आहेत. हे खेळाडू इंग्लंडमध्ये जैव-सुरक्षित वातावरणात होते. त्यामुळे त्यांना युएईत क्वारंटाईनमध्ये केवळ ३६ तास राहावे लागणार आहे आणि ते पहिल्या सामन्यापासूनच खेळू शकणार आहेत. आठही फ्रेंचायझीससाठी ही आनंदाची बातमी म्हणावी लागेल.

गांगुलीची युएईतील अधिकाऱ्यांसोबत चर्चा 

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या देशांच्या खेळाडूंना युएईमध्ये दाखल झाल्यानंतर सहा दिवस क्वारंटाईनमध्ये राहावे लागू शकेल असे याआधी म्हटले जात होते. मात्र, सौरव गांगुलीच्या अध्यक्षतेत बीसीसीआयने युएईतील स्थानिक अधिकाऱ्यांशी चर्चा करून क्वारंटाईनचा कालावधी कमी करून घेतला आहे. ‘इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना आता सहा दिवस नाही, तर केवळ ३६ तास क्वारंटाईनमध्ये राहावे लागणार आहे. बऱ्याच संघांसोबत आमची चर्चा झाली. त्यांचे स्टार खेळाडू आयपीएलच्या अगदी पहिल्या सामन्यापासूनच उपलब्ध असणार आहेत,’ असे आयपीएलच्या एका सिनियर अधिकाऱ्याने सांगितले. स्टिव्ह स्मिथ, डेविड वॉर्नर, जोफ्रा आर्चर यांसारखे खेळाडू गुरुवारी रात्री उशिराने युएई गाठतील असे म्हटले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -