घरक्रीडाEuro Cup Final: इटली दुसऱ्यांदा 'Euro Cup' चॅम्पियन; पेनल्टी शूटआऊटमध्ये इंग्लंडचा पराभव

Euro Cup Final: इटली दुसऱ्यांदा ‘Euro Cup’ चॅम्पियन; पेनल्टी शूटआऊटमध्ये इंग्लंडचा पराभव

Subscribe

युरो चषक २०२० च्या अंतिम सामन्यात इटलीने इंग्लंडचा पराभव केला. अंतिम सामना खूप रोमांचक होता, परंतु शेवटी इटलीने दणदणीत विजय मिळविला. दोन्ही संघांनी चांगली सुरुवात केली होती पण शेवटी पेनल्टी शूटआऊटमध्ये इटली चॅम्पियन ठरला. १२० मिनिटे चाललेला हा सामना प्रथम १-१ने बरोबरीत राहिला आणि त्यानंतर पेनल्टी शूटआऊटवर इटलीने ३-२ अशा गोलफरकानं बाजी मारली. या पराभवामुळे इंग्लंडचं पहिल्यावहिल्या युरो कप विजयाचं स्वप्न मात्र पुन्हा अपूर्णच राहिलं. दोन्ही संघांकडून सामन्यात आघाडी घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु होते. मात्र सामना बरोबरीत सुटल्यानं पेनल्टी शूटआऊटचा थरार रंगला. ज्यामध्ये इटलीनं विजय मिळवला. इटलीनं इंग्लंडचा ३-२ नं पराभव केला. इंग्लंड सलग 3 पेनल्टी स्कोर करु शकला नाही, तर इटलीनं २ पेनल्टी चुकवल्या, मात्र ३ गोल केले. यासह, इटली 1968 नंतर पुन्हा युरोपियन विजेता बनला आहे.

लंडनच्या ऐतिहासिक वेम्बली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या महाअंतिम सामन्याच्या सुरूवातीला लूक शॉने एक जोरदार गोल करून इंग्लंडला आघाडी मिळवून दिली. पहिल्या हाफच्या शेवटी इंग्लंडने इटलीवर १-० अशी आघाडी कायम राखली. मात्र, दुसऱ्या हाफच्या सुरूवातीला इटलीच्या लिओनार्डो बोनुशीनं सामन्याच्या ६७ व्या मिनिटाला गोल करत सामना १-१ अशी बरोबरीत रोखला. अशाप्रकारे, १२० मिनिटे चाललेला हा रोमांचक सामना१-१ ने बरोबरीत राहिला. त्यानंतर इटलीने पेनल्टी शूटआऊटमध्ये इंग्लंडचा ३-२ असा पराभव केला.

- Advertisement -

गेल्या ५५ वर्षांपासून इंग्लंडचा संघ कोणतीही मोठी फुटबॉल स्पर्धा जिंकू शकला नाही. अशातच युरो चषकाच्या अंतिम सामन्यात विजय मिळवण्याच्या हेतूने इटली मैदानावर उतरली होती. परंतु, पेनल्टी शूटआऊटमध्ये इटलीने विजयाला गवसणी घातली. इटलीच्या विजयानंतर इंग्लंडचं युरो चषकावर नाव कोरण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं आणि इंग्लंडचे जेतेपद जिंकण्याचे स्वप्न पुन्हा एकदा मोडले.


Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -