घरक्रीडाफिफा विश्वचषक २०१८: बाद फेरीला आरंभ

फिफा विश्वचषक २०१८: बाद फेरीला आरंभ

Subscribe

आज एकाच दिवशी आपल्याला मेस्सी आणि रोनाल्डो या दोन्ही दिग्गजांचे सामने पाहायला मिळणार आहेत.

फिफाचा पहिला टप्पा पार पडला असून आता गटनिहाय सामने संपून बाद फेरीचे सामने सुरू होत आहेत. आज बाद फेरीचे पहिले दोन सामने पार पडणार असून आजच्या दिवसाची विशेष गोष्ट ही आहे की आज एकाच दिवशी आपल्याला मेस्सी आणि रोनाल्डो या दोन्ही दिग्गजांचे सामने पाहायला मिळणार आहेत.
आज पहिला सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार ७.३० ला सुरु होणार आहे. जो फ्रान्स आणि अर्जेंटिना यांच्यात रंगणार आहे. फ्रान्स ‘क’ गटातून ७ गुणांसह दिमाखात बाद फेरीत पोहोचला आहे. तर दुसरीकडे ‘ड’ गटातून अर्जेंटिनाने कशीबशी ४ गुणांसह बाद फेरी गाठली आहे. अर्जेंटिनाची आतापर्यंतची विश्वचषकातील कामगिरी तितकी खास नसली तरी ‘ड’ गटात दुसरे स्थान मिळवल्यामुळे त्यांनी बादफेरी गाठली आहे. मात्र बादफेरीत पहिलाच सामना फ्रान्ससारख्या बलाढ्य संघांसोबत असल्याने अर्जेंटिनाला चांगली तयारी करावी लागणार आहे. अर्जेंटिनाचा लक्ष मेस्सीसोबतच शेवटच्या सामन्यात विजयी गोल नोंदविणाऱ्या मार्कोस रोजा याच्यावरही असेल.

lionel messi
लिओनल मेस्सीच्या प्रयत्नांना यश

यानंतर भारतीय वेळेनुसार ११.३० ला बाद फेरीचा दुसरा सामना सुरु होणार आहे. ज्यात रोनाल्डोची टोळी उरुग्वेसोबत लढणार आहे. पोर्तुगाल ‘ब’ गटातून ५ गुणांसह बाद फेरीत दाखल झाला आहे तर उरुग्वे ‘अ’ गटातून तब्बल ९ गुणांसह बाद फेरीत पोहोचला आहे. पोर्तुगालकडे रोनाल्डो सारखा दिग्गज खेळाडूं तर करिज्मा आणि आंद्रे सिल्वा सारखे अनुभवी खेळाडू ही आहेत तर उरुग्वेकडे सुवारेज आणि कवानीसारखे अप्रतिम स्ट्रायकर आहेत. त्यामुळे दोघांतील हा सामना चुरशीचा होणार हे नक्की…

c ronaldo
ख्रिस्तियानो रोनाल्डो किक घेताना
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -