घरदेश-विदेशभर सभेत महिलेने मुख्यमंत्र्यांना दिल्या शिव्या

भर सभेत महिलेने मुख्यमंत्र्यांना दिल्या शिव्या

Subscribe

उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांना 'सार्वजनिक संयोजन संमेलना'च्या कार्यक्रमात एका शिक्षिकेने शिवीगाळ केली. याप्रकरणी शिक्षिकेला अटक करण्यात आली होते. सोशल मीडियावर या घटनचे भरपूर पडसाद पडताना दिसत आहे.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांना ‘सार्वजनिक संयोजन संमेलना’च्या कार्यक्रमात एका शिक्षिकेने शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. गेल्या २५ वर्षांपासुन ही महिला उत्तराखंडच्या दुर्गम भागातील एका शाळेत नोकरी करत आहे. तिने अनेकदा प्रशासनाकडे आपली बदलीची मागणी केली. परंतु, प्रशासनाने तिच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे या कार्यक्रमाच्या भर सभेत त्या महिला शिक्षिकेने मुख्यमंत्र्यांकडे आपल्या बदलीची मागणी केली. महिलेच्या या मागणीकडे कुणी लक्ष न देत असल्याचे तिला जाणवताच, तीने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. महिलेच्या या आरोडाओरडीवर मुख्यमंत्री चांगलेच भडकले. त्यांनी तिला निलंबित केले जाईल असे सांगितले. महिलेचा वाढता रोष बघून मुख्यमंत्र्यांनी तिला अटक करण्याचे आदेश दिले. यानंतर महिलेने मुख्यमंत्र्यांना शिवीगाळ केल्यानंतर पोलिसांनी महिलेला अटक केली आहे.

कोण आहे ‘ती’ महिला शिक्षिका?

उत्तरा बहुगुणा नावाची ही महिला गेल्या २५ वर्षांपासून उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यातील नौगावच्या एका प्रार्थमिक शाळेत शिक्षिका आहे. ही महिला प्रशासनाकडे कित्येक वर्षांपासून आपल्या बदलीची मागणी करत आहे. गुरुवारी मुख्यमंत्र्यांच्या ‘सार्वजनिक संयोजन संमेलन सभे’त ही महिला आपल्या बदलीच्या मागणीसाठीच आली होती. महिलेचे म्हणणे आहे की, ती आता विधवा असून तिला तिच्या मुलांची काळजी घ्यावी लागते. त्यामुळे तिला तिच्या मुलांसोबत राहायचे आहे.

- Advertisement -

प्रशासन असंवेदनशील झाले आहे – हरीश रावत

याविषयी बोलताना त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांनी सांगितले की, ‘प्रशासन इतके असंवेदनशील झाले आहे की, एक विधवा महिला २५ वर्ष दुर्गम भागात काम करत असून देखील तिचे म्हणण कुणी एकूण घेत नाही. खरंतर मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी निलंबित शिक्षिकेला सोडून द्यायला हवे. तसेच त्या महिलेचे निलंबनही रद्द करायला हवे.’

मुख्यमंत्री विचारतात, नोकरी घेताना लिहून दिलेलं?

महिला शिक्षिकेने आपल्या बदलीची मागणी केली तेव्हा मुख्यमंत्री तिला विचारतात की, ‘नोकरी घेताना लिहून दिलेले का?’ या प्रश्नावर उत्तर देताना ती महिला म्हणाली की, ‘आयुष्यभर वनवास करायचे, हे सुद्धा लिहुन दिले नव्हते’. या नंतर गोंधळ सुरु झाला. मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना त्या महिलेला ताब्यात घेण्याचे आदेश दिले. त्यानंतर महिलेने मुख्यमंत्र्यावर अपशब्दांचा वर्षाव सुरु केला.

- Advertisement -

सोशल मीडियावर मुख्यमंत्री आणि महिला शिक्षिकेवर टिका

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे. महिलेच्या अपशब्दांवर कित्येक लोकांनी त्या महिलेवर टिका केली आहे. तर, काही लोकांनी मुख्यमंत्र्यांनी त्या महिलेला दिलेल्या वागणूकीवर नाराजी व्यक्त केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -