घरक्रीडाHarmanpreet kaur : आऊट देताच अंपायरवर भडकली हरमनप्रीत कौर; स्टंपवर भिरकावली बॅट

Harmanpreet kaur : आऊट देताच अंपायरवर भडकली हरमनप्रीत कौर; स्टंपवर भिरकावली बॅट

Subscribe

Harmanpreet kaur : भारतीय महिला संघ आणि बांगलादेश महिला संघात आज एकदिवसीय मालिकेतील अखेरचा सामना ढाका येथील शेरे बांगला नॅशनल स्टेडियम खेळविण्यात आला. दोन्ही संघानी मालिकेत बरोबरी साधल्यामुळे तिसरा सामना निर्णायक होता, त्यामुळे सर्व क्रिडा चाहत्याचे लक्ष या सामन्यावर लागले होते. परंतु हा सामनाही बरोबरीत सुटला. पण या सामन्यात भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर अंपायरवर भडकल्याचे पाहायला मिळाले. (Harmanpreet Kaur : Harmanpreet Kaur got angry with the umpire after giving out; Bat on the stump)

एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात बांग्लादेशने विजय मिळवून आघाडी घेतली होती, तर दुसऱ्या भारतीय संघाने विजय मिळवून 1-1 ने बरोबरी साधली. त्यामुळे तिसरा आणि अखेरचा सामाना दोन्ही संघांसाठी निर्णायक होता. या सामन्यात बांग्लादेश संघाने नाणेफेक जिंकून निर्धारीत 50 षटकांत 4 बाद 225 धावा केल्या. 226 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून स्मृती मंधाना आणि हरलीन देओल यांनी अर्धशतकी खेळी केली. स्मृती मंधाना हिने 85 चेंडूंत 5 चौकारांच्या मदतीने 59 धावा केल्या, तर हरलीन देओल हिने 108 चेंडूंत 9 चौकारांच्या मदतीने 77 धावा केल्या. या दोघींव्यतिरिक्त फक्त जेमिमाह रॉड्रिग्ज हिने 45 चेंडूंत 33 धावा केल्या. त्यामुळे भारतीय संघ सर्व बाद 225 धावाच करू शकल्यामुळे सामना बरोबरीत सुटला. पण या सामन्यात कर्णधार हरमनप्रीत कौरच्या विकेटने अनेकांचे लक्ष वेधले.

- Advertisement -

हरमनप्रीतची वादग्रस्त विकेट

भारतीय डावाच्या 34व्या षटकात हरमनप्रीत कौर 114 धावांवर खेलत असताना तिने नाहिदा अख्तरविरुद्ध स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, पण तिला तो शॉट खेळता आला नाही. चेंडू स्लिपमध्ये उभ्या असलेल्या क्षेत्ररक्षकाच्या हातात गेला. त्यामुळे बांगलादेशी खेळाडूंनी स्लिपमध्ये झेलचा दावा करत विकेटसाठी अपील केले, परंतु पंच तनवीर हसन यांनी हरमनप्रीत कौरला एलबीडब्ल्यूसाठी बाद घोषित केले. एलबीडब्ल्यू बाद दिल्यामुळे हरमनप्रीतला राग अनावर झाला आणि तिने आपलली बॅट स्टंपवर आपटली. एवढचं नाही तर तिने पॅव्हेलियनमध्ये परतताना अंपायरला रागाने काहीतरी बोलताना दिसली.

- Advertisement -

बांग्लादेशची फलंदाजी  

दरम्यान, बांग्लादेश महिला संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारीत 50 षटकात 225 धावा केल्या. बांग्लादेश संघाकडून फरझाना होक हिने शतकी खेळी केली. तिने 160 चेंडूत 7 चौकारांच्या मदतीने सर्वाधिक 107 धावा केल्या. फरझानाशिवाय शमीमा सुल्ताना (52), कर्णधार निगर सुल्ताना (24) आणि सोभना मोस्टरीला नाबाद (23) धावा केल्या. भारताकडून स्नेह राणाला सर्वाधिक 2 विकेट, तर देविका वैद्यला 1 विकटे मिळाली.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -