घरक्रीडापाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान कोकेन घ्यायचे; पाकिस्तानच्या माजी गोलंदाजाचा आरोप

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान कोकेन घ्यायचे; पाकिस्तानच्या माजी गोलंदाजाचा आरोप

Subscribe

पाकिस्तानचे माजी वेगवान गोलंदाज सरफराज नवाज यांनी विद्यमान पाकिस्तानचे पंतप्रधान आणि माजी कर्णधार इम्रान खान यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. इम्रान कोकेन घेत असल्याचा दावा सरफराज यांनी केला आहे. सरफराजच्या खळबळजनक दावा करणार व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

१९७० आणि ८० च्या दशकात सरफझ पाकिस्तानी संघाचा स्टार वेगवान गोलंदाज होते. इम्रान खान सोबत ते खेळले आहेत. सरफराज यांनी असेही म्हटले आहे की जर इम्रानने दावा खोटा आहे, असे जर म्हणाला तर इमरान खान यांना न्यायालयात घेऊन जाईन. सरफराज नवाज यांनी एक व्हिडीओ शेअर केला असून इम्रान खान यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या व्हिडिओमध्ये सरफराज यांनी १९८७ च्या सामन्याचा उल्लेख केला आहे. हा सामना इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात खेळला गेला. सरफराज यांच्या म्हणण्यानुसार या सामन्यात इम्रान खान यांची कामगिरी चांगली नव्हती. इम्रान खान इस्लामाबादमध्ये त्यांच्या घरी आले होते. तेव्हा जेवताना मादक पदार्थ सेवन केला होता, असे सांगून त्यांनी घटनेची आठवण केली.

- Advertisement -

Imran Khan Consumed charas,"- Former Pakistan Cricketer Sarfaraz Nawaz

गुगली न्यूज टीव्हीशी बोलताना सरफराज म्हणाले,”१९८७ मध्ये पाकिस्तानचा इंग्लंडसोबत सामना होता. तेव्हा इम्रान खान माझ्या इस्लामाबादच्या घरी आला होता. तेव्हा इम्रान खान १०-२० रुपयांच्या नोटांमध्ये कोकेन टाकून त्याचे सेवन करायचा. भांगला सुकवून त्याचा चरस बनवत असत. इम्रानबरोबर मोहसीन खान, अब्दुल कादिर आणि सलीम मलिक हे होते.

- Advertisement -

कोण आहेत सरफराज नवाज?

सरफराज नवाज यांनी १९६९ ते १९८४ पर्यंत पाकिस्तानकडून ५५ कसोटी आणि ४५ एकदिवसीय सामने खेळले आहेत. संघासाठी दीर्घकाळ इम्रान खानसोबत त्यांनी देशासाठी गोलंदाजी केली. कसोटी क्रिकेटमध्ये सरफराज यांनी १७७ विकेट्स घेतले आहेत. कसोटी क्रिकेटमध्येही त्याने ५००० हून अधिक धावा केल्या. क्रिकेटनंतर ते पाकिस्तानमध्ये खासदार झाले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -