घरक्रीडाIND vs ENG 5th Test : कुलदीपचा 'पंच'; पहिल्या दिवशी भारताचे अधिराज्य

IND vs ENG 5th Test : कुलदीपचा ‘पंच’; पहिल्या दिवशी भारताचे अधिराज्य

Subscribe

धर्मशाला : कुलदीप यादवच्या पाच विकेट आणि 100 वी कसोटी खेळणाऱ्या रविचंद्रन अश्विनच्या चार विकेटच्या जोरावर इंग्लंडचा पहिला 218 धावांवर संपुष्टात आला. यानंतर भारताचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल अर्धशतक पूर्ण करून बाद झाल तर कर्णधार रोहित शर्मानेही आपले अर्धशकत पूर्ण केले. त्यामुळे पहिला दिवसावर भारताचे अधिराज्य असल्याचे पाहायला मिळाले. (IND vs ENG 5th Test Kuldeeps punch Dominion of India on day one)

हेही वाचा – Dinesh Kartik : आयपीएलच्या 16 व्या पर्वानंतर दिनेश कार्तिक होणार निवृत्त?

- Advertisement -

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या इंग्लंड संघाची सुरुवात चांगली झाली. बेन डकेट आणि जॅक क्रोली यांनी पहिल्या विकेटसाठी 64 धावांची भागीदारी केली. मात्र कुलदीपने ही भागीदारी मोडीत काढली. कुलदीपने डकेटला शुभमन गिलकडे झेल देण्यात भाग पाडले. डकेट 27 धावा करून बाद झाला. यानंतर सलामीवीर जॅक क्रॉलीने कसोटी कारकिर्दीतील 14वे आणि भारताविरुद्ध पाचवे अर्धशतक पूर्ण केले. उपाहारापूर्वी कुलदीपने ऑली पोपला यष्टिरक्षक ध्रुव जुरेलकडून यष्टिचित करून इंग्लांड संघाला आणखी एक धक्का दिला. पोप 11 धावा करून बाद झाला.

- Advertisement -

दुसऱ्या सत्रात इंग्लंडने 29.3 षटकात फलंदाजी करताना 6 विकेट गमावून 94 धावा केल्या होत्या. एके काळी इंग्लंडची धावसंख्या 38व्या षटकात दोन विकेट बाद 137 धावा होती. मात्र जॅक क्रॉली बाद झाल्यानंतर 58 व्या षटकात इंग्लंडचा संपूर्ण डाव 218 धावांवर संपुष्टात आला. जॅक क्रॉलीने 108 चेंडूंत 11 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 79 धावा केल्या. त्याचवेळी जो रूटने 26 धावा आणि 100 वी कसोटी खेळणारा जॉनी बेअरस्टोने 29 धावांचे योगदान दिले. भारताकडून कुलदीप यादवने 5, तर 100 वी कसोटी खेळणाऱ्या अश्विनने 4 विकेट घेतल्या. याचवेळी रवींद्र जडेजाल 1 विकेट मिळाली.

हेही वाचा – Congress : निवडणूक आयोगाची राहुल गांधींना ॲडव्हायजरी नोटीस, काँग्रेस नेते संतापून म्हणाले – “जेव्हा मोदी…”

इंग्लंडकडून मिळालेल्या 218 धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली. पहिल्या दिवसअखेर भारताने 30 षटकात 1 विकेट गमावत 135 धावा केल्या आहेत. कर्णधार रोहित शर्मा 52 धावांवर आणि शुभमन गिल 26 धावांवर नाबाद आहे. दोघांमध्ये 31 धावांची भागीदारी झाली आहे. तर सलामीवीर यशस्वी जैस्वाल 58 चेंडूत पाच चौकार आणि 3 षटकाराच्या मदतीने 57 धावा करून बाद झाला. शोएब बशीरने त्याला यष्टिरक्षक बेन फॉक्सकरवी यष्टिचित केले. दरम्यान, भारत अजूनही इंग्लंडपेक्षा 83 धावांनी मागे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -