घरक्रीडाIND vs SA: पाच वर्षांनंतर One Day सामन्यात भारताचा दक्षिण आफ्रिकेवर विजय;...

IND vs SA: पाच वर्षांनंतर One Day सामन्यात भारताचा दक्षिण आफ्रिकेवर विजय; गोलंदाजांची दमदार कामगिरी

Subscribe

आजच्या सामन्यांत भारतीय गोलंदाज अर्शदीप सिंग आणि आवेश खान या जोडीने धुमाकूळ घातला. दोघांनी मिळून नऊ विकेट घेतल्या. पाच विकेट घेणाऱ्या अर्शदीप सिंगला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

जोहान्सबर्ग : भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेची विजयाने सुरुवात केली आहे. आफ्रिकन संघाचा पराभव करून मालिकेत 1-0 अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. याच वनडे मालिकेतील दुसरा सामना आता मंगळवारी (19 डिसेंबर) गकबेराह येथे होणार आहे. दरम्यान दक्षिण आफ्रिकेला त्यांच्याच मैदानावर जाऊन हरविण्यात भारताला पाच वर्षांनंतर यश आले आहे हे विशेष. (IND vs SA India beat South Africa in ODI after five years Strong performance by the bowlers)

आजच्या सामन्यांत भारतीय गोलंदाज अर्शदीप सिंग आणि आवेश खान या जोडीने धुमाकूळ घातला. दोघांनी मिळून नऊ विकेट घेतल्या. पाच विकेट घेणाऱ्या अर्शदीप सिंगला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. या दोघांच्या उत्कृष्ट कामगिरीनंतर साई सुदर्शनने पदार्पणाच्याच सामन्यात अर्धशतक झळकावून सामना संपवला. श्रेयस अय्यरनेही अर्धशतकी खेळी खेळली.

- Advertisement -

हेही वाचा : Pravin Darekar : सहकारात काम करण्याची इच्छा असलेला निश्चितच पुढे जातो- प्रवीण दरेकर

भारतविरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला आज रविवार (17 डिसेंबर) पासून सुरुवात झाली. पहिला सामना आफ्रिकेच्या जोहान्सबर्गमध्ये खेळविल्या गेला. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, त्याचा हा निर्णय त्याच्याच पथ्यावर पडला. दक्षिण आफ्रिकेच्या संघाला केवळ 116 धावाच करता आल्या. टीम इंडियातील यंग ब्रिगेडने पहिल्याच सामन्यात उत्तम कामगिरी केली आहे.
भारताने दक्षिण आफ्रिकेचा डाव 27.3 ओव्हरमध्ये 116 धावांतच गुंडाळला. भारताकडून अर्शदीप सिंगने पाच विकेट घेतल्या. तर आवेश खानने चार विकेट घेतल्या. कुलदीप यादवने नंद्रा बर्गरला त्रिफळचित केले.

- Advertisement -

हेही वाचा : Winter Session : हिवाळी अधिवेशनात विदर्भ दुर्लक्षित; शेवटच्या दिवशी पॅकेज घोषित होणार?

तब्बल पाच वर्षांनंतर आफ्रिकेवर मात

जोहान्सबर्गच्या न्यू वँडरर्स स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांचा संघ 116 धावांत गारद झाला. प्रत्युत्तरात टीम इंडियाने 16.4 षटकात 117 धावा करत सामना जिंकला. भारताने पाच वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेला त्याच्या घरच्या मैदानावर एकदिवसीय सामन्यात पराभूत केले. टीम इंडियाचा शेवटचा विजय 2018 मध्ये सेंच्युरियनच्या मैदानावर होता. त्याला 2022 मध्ये सलग तीन सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -