घरमुंबईPravin Darekar : सहकारात काम करण्याची इच्छा असलेला निश्चितच पुढे जातो- प्रवीण दरेकर

Pravin Darekar : सहकारात काम करण्याची इच्छा असलेला निश्चितच पुढे जातो- प्रवीण दरेकर

Subscribe

दादर येथे भाजपा सहकार आघाडीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या 'सहकार निर्धार' मेळाव्यात आमदार प्रवीण दरेकर बोलत होते.

मुंबई : सहकारात ज्यांच्याकडे काम करण्याची प्रबळ इच्छाशक्ती आहे तो निश्चितच या क्षेत्रात पुढे जातो, असे वक्तव्य भाजपा विधानपरिषद गटनेते आणि मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांनी केले आहे. दादर येथे भाजपा सहकार आघाडीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘सहकार निर्धार’ मेळाव्यात ते बोलत होते. (Pravin Darekar One who wants to work in cooperation definitely goes ahead Pravin Darekar)

यावेळी सहकारातील कार्यकर्त्यांना संबोधीत करताना दरेकर म्हणाले की, नव्या पिढीतील तरुणांनी, महिलांनी सहकारात आले पाहिजे, ही माझी इच्छा आहे. आणि सहकाराच्या माध्यमातून आपण मजबूत होऊन, आपल्या सहकाऱ्यांना मजबूत करत समाजासाठी आपल्याला योगदान देता आले पाहिजे, या भावनेतून मी अनेकदा प्रयत्न केले. माझ्या व्यस्ततेमुळे तो योग जुळून येतं नव्हता. पण ज्या पद्धतीने सुनील बांबूळकर यांनी सहकार आघाडीचे काम सुरू केले आहे. निश्चितच त्याला चांगले यश आल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास दरेकरांनी व्यक्त केला.

- Advertisement -

दरेकर पुढे म्हणाले की, मी सहकारात आलो त्यावेळी सहकारबाबत मला काही माहिती नव्हती. सहकारी संस्था कशासाठी स्थापन करतात हेही मला माहीत नव्हते. पण नंतर त्याचे फायदे, सहकाऱ्यांना ताकद देता येते, नेतृत्व उभे राहते, अशा प्रकारे आवड निर्माण होत आज स्वतःचे सहकार क्षेत्रात स्थान निर्माण करू शकलो. त्यामुळे सहकारात नवीन आहे, कोण मदत करणार हे न बाळगता ज्यांच्याकडे काम करायची इच्छा आहे तो यात निश्चित पुढे जाईल असे माझे मत आहे. काही लोकं संकुचित वृत्तीने सहकारात काम करतात. परंतु मी सहकारात काम करत असताना कधीच संकुचित वृत्ती वापरली नाही.

सहकार हा माझा श्वास आहे. सहकारात नवीन कार्यकर्ते आले पाहिजेत, त्यांनी संस्था उभ्या केल्या पाहिजेत, स्वतः ते मजबूत झाले पाहिजेत, आपल्या सहकाऱ्यांना त्यांना मजबूत करता आले पाहिजे. या राज्याला सहकाराचा इतिहास आहे. हे राज्य उभे राहिले त्यात सहकाराचे फार मोठे योगदान आहे. ग्रामीण भागाचा सर्व विकास हा सहकारातून झालेला आहे. राज्याच्या बजेटपेक्षा जास्त पैसे आपल्या सहकाराच्या संस्थांमध्ये आहे. परंतु अलिकडच्या काळात सहकारी संस्था डबघाईला आलेल्या दिसताहेत. नवीन संस्था कोण काढत नाही, जुन्या सहकारी संस्था वाचविण्याचा कोणी प्रयत्न करत नाही. अशा वेळी कुणी कार्यकर्त्याने पुढे येऊन ज्या बंद पडत असलेल्या सहकारी संस्था का बंद पडताहेत? त्या चालू करण्यासाठी काय केले पाहिजे यासाठी प्रयत्न करायला हवेत. तुमच्यातील कार्यकर्त्याने वेगवेगळ्या प्रकारच्या सहकारी संस्था स्थापन करून तुमच्यातील नेतृत्व मोठे करायला पाहिजे.

- Advertisement -

दरेकर पुढे म्हणाले की, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार या उक्तीप्रमाणे आपल्याला कुणी मोठे करायची गरज नाही, आपण मेहनत घेतली तर आपण आपले नेतृत्व पुढे नेऊ शकतो. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. इकडे येऊन लोकं मोठी होतात. आपल्याला का वाटत नाही? असा सवालही दरेकरांनी उपस्थितांना विचारला. तसेच मुंबई जर देशाची आर्थिक राजधानी असेल आणि येथे खासगी बँकांचे वर्चस्व असेल तर ते मोडून मुंबईच्या अर्थव्यवस्थेवर सहकाराचे वर्चस्व असले पाहिजे. आता ही गर्दी पाहिल्यावर तुमच्या आधारे तुम्हाला काम देऊन आपण याची सुरुवात करू शकतो हा आत्मविश्वास मला तुमच्या उत्साहातून दिसतोय, असेही दरेकर म्हणाले.

हेही वाचा : Winter Session : हिवाळी अधिवेशनात विदर्भ दुर्लक्षित; शेवटच्या दिवशी पॅकेज घोषित होणार?

तुम्हाला ताकद देण्याची माझ्यासारख्या कार्यकर्त्याची तयारी असेल तर तुम्हीही मेहनत केली पाहिजे, त्याचे फळं तुम्हाला मिळणार. सहकार हा विषय केवळ तुम्ही संस्था काढणे, निवडणुकीला उभे राहणे एवढ्यापुरता मर्यादित नाही. तर सहकारी संस्थेच्या माध्यमातून तुम्ही कोणत्याही प्रकारचा व्यवसाय करू शकता. कुठल्याही प्रकारची सहकारी संस्था काढू शकता ज्याआधारे तुम्हाला त्याक्षेत्रात व्यवसाय करता येतो. ग्रामीण भागातील संस्था मुंबईत येऊन व्यवसाय करू शकतात तर मुंबईतील माझा तरुण-तरुणी का करू शकत नाही? अर्थात तो दोष तुमचा नाही. कारण तुम्हाला असे कुणी सांगितलेच नाही. पण आज ते सांगायचे काम सहकार आघाडीच्या माध्यमातून सुनील बांबूळकर यांनी केले असल्याचे दरेकर म्हणाले.

हेही वाचा : CM Eknath Shinde : मुंबईतील ‘स्वच्छता मोहीम’ आता महाराष्ट्रभर; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्धार

सहकारात पक्ष, जात-पात नसते

दरेकर म्हणाले की, सहकारात पक्ष, जात-पात काही नसते. कुठल्याच सहकाराच्या निवडणुकीत पक्षाचे चिन्हं नसते. याचे कारण सहकारात पक्षाची पादत्राने बाहेर काढून लोकं एकत्रित येत असतात. विविध पक्षाची लोकं एकत्र येऊन सहकारी संस्थेच्या, सहकारच्या माध्यमातून काम करत असतात. तशाच प्रकारे काम आपल्याला उभे करायचे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -