घरक्रीडाIND vs SL : बंगळुरू डे-नाईट कसोटीपूर्वी चाहत्यांसाठी खूशखबर, स्टेडियममध्ये १०० टक्के...

IND vs SL : बंगळुरू डे-नाईट कसोटीपूर्वी चाहत्यांसाठी खूशखबर, स्टेडियममध्ये १०० टक्के दर्शकांना परवानगी

Subscribe

टीम इंडिया आणि श्रीलंकामध्ये दोन कसोटी सामन्यांची मालिकेचा अंतिम सामना बंगळूरुमध्ये १२ मार्चपासून सुरु होणार आहे. हा सामना डे-नाईट कसोटी सामना असेल आणि त्याची तयारीसुद्धा पूर्ण झाली आहे. सामन्यापूर्वीच प्रेक्षकांना खुशखबर मिळाली आह ती म्हणजे सामना पाहण्यासाठी १०० टक्के प्रेक्षकांना परवानगी मिळणार आहे. कर्नाटक स्टेट क्रिकेट असोसिएशनचे सेक्रेटरी संतोष मेनन यांनी याबाबतची माहिती दिली आहे. गुलाबी चेंडू कसोटी सामना पूर्ण प्रेक्षकांच्या आसनक्षमतेत होणार आहे. यासाठी राज्य सरकारकडून परवानगी घेण्यात आली आहे. १०० टक्के प्रेक्षकांसाठी तयारीसुद्धा करण्यात आली असून तिकीटसुद्धा जारी करण्यात आले आहे.

गुलाबी चेंडू कसोटी सामना बंगळूरुच्या एम चिन्नास्वामी क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. प्रेक्षकांसाठी ४ प्रकारच्या दरात तिकीट ठरवण्यात आले आहेत. यामध्ये सगळ्यात महागडं तिकीट १२५० रुपयांचे आहे. तर सर्वात स्वस्त १०० रुपयांचे तिकीट आहे. ग्रांड टॅरेससाठी चाहत्यांना १२५० रुपये मोजावे लागणार आहे. ई-एक्जीक्यूटिवची किंमत ७५० रुपये, डी-कॉर्पोरेटची किंमत ५०० रुपये आणि सगळ्यात कमी १०० रुपयांचे तिकीट आहे.

- Advertisement -

भारतीय टीम चौथा डे-नाईट सामना खेळणार

श्रीलंका क्रिकेट संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. भारतीय टीम आणि श्रीलंकेमध्ये दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात येत आहे. पहिला सामना मोहालीमध्ये झाला जो भारताने २२२ धावांनी जिंकला होता. तर दोन्ही संघांमध्ये मालिकेचा शेवटचा आणि दुसरा सामना बंगळुरूमध्ये १२मार्चला होणार आहे. भारतीय संघाचा चौथा आणि देशांतर्गत तिसरा डे-नाईट कसोटी आहे. टीम इंडियाने आतापर्यंत ३ मधले २ पिंक बॉल कसोटी सामने जिंकले आहेत. दोन्ही सामने देशातच खेळले आहेत. फक्त एक डे-नाईट कसोटी सामन्यात पराभव झाला आहे. जो डिसेंबर २०२० मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये एडलिडमध्ये खेळवण्यात आला होता. हा भारताने विदेशातील मैदानात खेळला आहे.


हेही वाचा : India Vs Sri Lanka : जयंत यादवला श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतून मिळू शकतो डच्चू, अक्षर पटेलला संधी मिळण्याची शक्यता

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -