घरक्रीडाRohit Sharma captaincy : भारतीय संघात खेळायचे आहे तर दबावाचा सामना करावा...

Rohit Sharma captaincy : भारतीय संघात खेळायचे आहे तर दबावाचा सामना करावा लागेलच; कर्णधार रोहित शर्माचे मोठे विधान

Subscribe

भारतीय संघात मर्यादित षटकांचा नवा कर्णधार म्हणून रोहित शर्माची काही दिवसांपूर्वीच निवड करण्यात आली आहे

भारतीय संघात मर्यादित षटकांचा नवा कर्णधार म्हणून रोहित शर्माची काही दिवसांपूर्वीच निवड करण्यात आली आहे. दरम्यान रोहित शर्माकडे आता टी-२० सोबतच एकदिवसीय क्रिकेटच्या कर्णधारपदाची देखील धुरा असणार आहे. दरम्यान भारतीय संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याच्या पूर्वसंध्येला कर्णधार रोहित शर्माने मोठे विधान केले आहे. त्याने म्हंटले की, भारतीय संघासाठी खेळणाऱ्या खेळाडूंवर नेहमीच दबाव असेल आणि खेळाडूंनी लोकांच्या गोंगाटाच्या विरोधात देखील आपल्या कामगिरीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. भारतीय संघाचे कर्णधारपद मिळाल्यानंतर रोहितवर देखील दबाव असणार आहे. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने (BCCI ) आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर नवनियुक्त कर्णधाराचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये रोहितने संघाला दबाव आणि त्याला सामोरे जाण्यासाठी सकारात्मक विचार करायला हवा असे म्हंटले आहे.

विराट कोहलीने टी-२० विश्वचषकानंतर मर्यादित टी-२० फॉरमॅटमध्ये कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर रोहितकडे टी-२० च्या संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले. नंतर या मुंबईच्या फलंदाजाला भारताच्या एकदिवसीय संघाचा कर्णधार म्हणूनही नियुक्त करण्यात आले. कारण निवडकर्त्यांना टी-२० आणि एकदिवसीय संघांसाठी दोन वेगळे कर्णधार हवे नव्हते.

- Advertisement -

दरम्यान सलामीवीर रोहितने सांगितले की, दबाव असेल, पण तो आपल्या कामावर लक्ष केंद्रित करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेल. या व्हिडिओमध्ये रोहित म्हणाला, ‘माझ्यासाठी वैयक्तिकरित्या, एक क्रिकेटर म्हणून माझ्यासाठी कामावर लक्ष केंद्रित करणे आणि लोक काय बोलत आहेत याकडे लक्ष न देणे महत्त्वाचे आहे. कारण तुम्ही त्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही. मी ते खूप वेळा सांगितले आहे आणि मी ते पुन्हा पुन्हा संघाला सांगत राहीन.

- Advertisement -

३४ वर्षीय दिग्गज खेळाडू रोहितने सांगितले की, भारताकडून खेळताना खेळाडूंनी संघाला मजबूत करावे आणि बाहेरील आवाजाकडे लक्ष न देता केवळ खेळावर लक्ष केंद्रित करावे अशी माझी इच्छा आहे. “संघासाठी देखील हा संदेश आहे आणि संघाला हे समजते की जेव्हा आम्ही मोठ्या नामांकितस्पर्धा खेळतो तेव्हा बर्‍याच गोष्टी घडतात.” असे रोहितने आणखी म्हंटले.


हे ही वाचा:  http://IND vs SA Test series : अजिंक्य रहाणेला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवणे खूप कठीण; गौतम गंभीरचा दावा


 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -