घरक्रीडाइंडियन ओपन बॅडमिंटन स्पर्धा

इंडियन ओपन बॅडमिंटन स्पर्धा

Subscribe

सिंधू, श्रीकांतची विजयी सलामी

भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने इंडियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेची विजयी सुरुवात केली आहे. तिने महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत भारताच्याच मुग्धा आग्रेचा पराभव केला. पुरुष एकेरीत भारताच्या किदाम्बी श्रीकांत, साई प्रणित आणि एच. एस. प्रणॉय यांनाही आपापले पहिल्या फेरीतील सामने जिंकण्यात यश आले.

महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत सिंधूने मुग्धा आग्रेवर २१-८, २१-१३ अशी सरळ गेममध्ये मात केली. २३ मिनिटे झालेल्या या सामन्याचा पहिला गेम सिंधूने अगदी सहजपणे जिंकला. दुसर्‍या गेममध्ये मुग्धाने सिंधूला झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र, सिंधूने अप्रतिम खेळ करत हा गेम २१-१३ असा जिंकत दुसर्‍या फेरीत प्रवेश केला.

- Advertisement -

पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीच्या रंगतदार सामन्यात किदाम्बी श्रीकांतने हाँगकाँगच्या व्हिन्सेंट विंग कि वॉन्गचा २१-१६, १८-२१, २१-१९ असा पराभव केला. श्रीकांतने या सामन्याचा पहिला गेम २१-१६ असा सहजपणे जिंकला. दुसर्‍या गेममध्ये वॉन्गने दमदार पुनरागमन केले. त्यामुळे श्रीकांत या गेममध्ये ७-१४ असा पिछाडीवर होता. यानंतर श्रीकांतने या गेममध्ये परत येण्याचा प्रयत्न केला. मात्र, वॉन्गने हा गेम २१-१८ असा ३ गुणांनी जिंकला. तिसर्‍या आणि निर्णायक गेममध्ये दोन्ही खेळाडूंनी चांगला खेळ केला. या गेममध्ये वॉन्गकडे १८-१५ अशी आघाडी होती आणि तोच हा सामना जिंकणार असे वाटत होते. मात्र, श्रीकांतने जिद्दीने खेळ करत हा गेम २१-१९ असा जिंकत हा सामनाही जिंकला.

तसेच साई प्रणितने भारताच्याच कार्तिकेय गुलशन कुमारचा २२-२४, २१-१३, २१-८ असा पराभव केला. एच. एस. प्रणॉयने थायलंडच्या वॉन्गचरॉनला १४-२१, २१-१८, २१-१४ असे पराभूत केले. समीर वर्माने डेन्मार्कच्या रॅसमस गेमकेचा २१-१८, २१-१२ असा सरळ गेममध्ये पराभव केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -