घरमहाराष्ट्रवंचित बहुजन आघाडीच्या प्रचाराला १६ लाखांचे हेलिकॉप्टर!

वंचित बहुजन आघाडीच्या प्रचाराला १६ लाखांचे हेलिकॉप्टर!

Subscribe

दिवसाला ८० हजार रूपये खर्च

वंचित बहुजन आघाडीच्या प्रचारापासून त्यांच्या उमेदवारांपर्यंत सगळ्याच गोष्टींवर चर्चा सुरू असताना आता आणखी एका मुद्द्याची चर्चा सुरू झाली असून तो म्हणजे त्यांच्या प्रचाराचे हेलिकॉप्टर! तब्बल १६ लाख रुपयांचा करार करून हे हेलिकॉप्टर अवघ्या २० दिवसांसाठी भाड्याने घेतले गेले आहे. याची माहिती स्वत: प्रकाश आंबेडकर यांनीच मुंबईत पत्रकार परिषद घेऊन दिली आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या हेलिकॉप्टर वार्‍यांवर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आली होती. तसेच ‘आम्हाला सुद्धा असे वंचित व्हायला आवडेल’, अशा प्रकारच्या टीका सोशल मीडियावर करत त्यांना ट्रोल करण्यात आले होते. त्यावर खुलासा करण्यासाठी आंबेडकरांनी ही पत्रकार परिषद घेतली होती.

हे वाचा – शरद पवारांच्या बारामतीला सुरुंग लावण्यासाठी भाजपाची रणनीती

- Advertisement -

‘लातूरच्या सभेला जायला मी हेलिकॉप्टर वापरले होते. त्यावरून बरेच राजकारण झाले. पण अशोक चव्हाण किंवा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ही शुद्र मानसिकता दाखवली आहे. राज्यातल्या सर्व मतदारसंघात फिरण्यासाठी २० दिवसांसाठी आम्ही भाड्याने हे हेलिकॉप्टर घेतले आहे. पुण्यातील मांडके अ‍ॅण्ड मांडके कंपनीसोबत करार झाला आहे. भारिपच्या पक्ष निधीतून त्याचा पैसा जाणार आहे. ज्यांना वाटते आम्हीच फक्त हेलिकॉप्टर वापरू शकतो, बाकीच्यांनी बैलगाड्यातच फिरावं, त्यांनी शुद्र मनोवृत्तीचे दर्शन घडवले आहे’, असे आंबेडकर यावेळी म्हणाले.

भारिपला मिळणार्‍या देणग्यांचेही स्पष्टीकरण यावेळी प्रकाश आंबेडकरांनी दिले. ‘आम्हाला काही निधी हा चेकने तर काही निधी रोख स्वरूपात मिळतो. पण तो सगळा आम्ही बँकेत जमा करतो. त्याचे बँकेचे तपशील देखील उपलब्ध आहेत. ज्यांना शंका असेल, त्यांनी तपासून पाहावेत’, असे ते म्हणाले. तसेच, ‘आमचा प्रचार आणि निवडणूक खर्च कमी असून ही ‘लो कॉस्ट इलेक्शन’ची सुरुवात आहे’, असे देखील त्यांनी सांगितले.

- Advertisement -

मोदींना पराभव दिसत असल्यामुळेच…

डीआरडीओच्या शास्त्रज्ञांनी अ‍ॅन्टी सॅटेलाईट मिसाईल अर्थात एसॅटची यशस्वी चाचणी केल्यानंतर मोदींनी जाहीरपणे सगळ्यांना ही बाब सांगितली. मात्र, ‘डिफेन्समधल्या गोष्टींवर सिक्रसी असायला हवी. अ‍ॅन्टी मिसाईल टेक्निक जेव्हा चीनने प्रत्यक्ष वापरले, तेव्हाच ते जगासमोर आले. आतापर्यंत कोणत्याही पंतप्रधानांनी हे जाहीर केलेले नाही. पण मोदींनी ते जाहीर केले. मोदींना समोर पराभव दिसत असल्यामुळेच त्यांनी घोषणा केली’, असे देखील आंबेडकर यावेळी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -