घरक्रीडाभारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट निलंबित, रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाची कारवाई

भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट निलंबित, रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाची कारवाई

Subscribe

विनेशला यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धांत पदकासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते.

भारताची आघाडीची कुस्तीपटू विनेश फोगटला टोकियो ऑलिम्पिकमध्ये चांगली कामगिरी करता आली नाही. त्यातच या स्पर्धेदरम्यान केलेल्या बेशिस्त वर्तणुकीमुळे तिच्यावर भारतीय कुस्ती फेडरेशनने (डब्ल्यूएफआय) तात्पुरत्या निलंबनाची कारवाई केली आहे. विनेशला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून याचे उत्तर देण्यासाठी तिला १६ ऑगस्टपर्यंतचा वेळ देण्यात आल्याचे समजते. तसेच युवा कुस्तीपटू सोनम मलिकलाही नोटीस बजावण्यात आली आहे.

विनेशला यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धांत पदकासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते. परंतु, उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाल्यामुळे तिचे ऑलिम्पिक पदकाचे स्वप्न अधुरेच राहिले. विनेशने ऑलिम्पिकपूर्वी हंगेरी येथे प्रशिक्षक वॉलर अकॉस यांच्या मार्गदर्शनात सराव केला होता. हंगेरीहून थेट टोकियोत दाखल झाल्यावर तिने ऑलिम्पिक क्रीडानगरीत राहून इतर भारतीय कुस्तीपटूंसोबत सराव करण्यास नकार दिला होता. तसेच सामना खेळताना तिने भारतीय पथकाचे अधिकृत प्रायोजक असलेल्या शिव नरेश यांच्या लोगोऐवजी नाईकी या कंपनीचा लोगो कपड्यावर वापरला.

- Advertisement -

तिच्या या बेशिस्त वर्तणुकीमुळे तिला तात्पुरते निलंबित करण्यात आले आहे. ती तिला पाठवण्यात आलेल्या नोटीसचे उत्तर देत नाही आणि डब्ल्यूएफआय अंतिम निर्णय घेत नाही, तोपर्यंत तिला स्थानिक किंवा राष्ट्रीय अशा कोणत्याही कुस्ती स्पर्धांत भाग घेता येणार नसल्याचे सांगण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -